Ram Mandir Donation Scam: राम मंदिरातील देणगी घोटाळ्याची शिवसेना साक्षीदार! संजय राऊतांनी केले गंभीर आरोप

Ram Mandir Trust Issue: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोठ्या प्रमाणावर देणग्यांचा ओघ सुरु झाला होता, पण या देणग्या स्विकारल्यानंतर त्यांचा कुठलाही हिशोब ठेवण्यात आलेला नाही, हे आता उघड झालं आहे.
Shivsena donate silver brick of 4 KG to Ram Mandir Nyas
Shivsena donate silver brick of 4 KG to Ram Mandir NyasSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut serious allegations on Ram Mandir issue: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोठ्या प्रमाणावर देणग्यांचा ओघ सुरु झाला होता, पण या देणग्या स्विकारल्यानंतर त्यांचा कुठलाही हिशोब ठेवण्यात आलेला नाही, हे आता उघड झालं आहे.

यामुळं राम मंदिर उभारणीपासून, त्याच्या उद्घाटनावेळी झालेल्या राजकारणापासून ते आता मंदिरात झालेल्या आर्थिक घोटाळ्यापर्यंत कायम चर्चेत राहिलं आहे. याच आर्थिक घोटाळ्याचा शिवसेना देखील साक्षीदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासाठी संजय राऊत यांनी राम मंदिर ट्रस्टवर शुक्रवारी गंभीर आरोप केले.

Shivsena donate silver brick of 4 KG to Ram Mandir Nyas
Tukaram Mundhe: "ही तर केवळ सुरुवात..."; तुकाराम मुंढेंचं पुढचं पाऊल काय? नेतृत्वावर भाष्य करत दिले मोठे संकेत

संजय राऊतांनी राम मंदिरातील देणगी घोटाळ्यावर भाष्य करताना म्हटलं की, "अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेने दान केलेली ४ किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता झाल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधू-संतांच्या उपस्थितीत १ कोटी रुपये आणि ही पवित्र चांदीची वीट सढळ हाताने दान केली होती. तरीही, इतकी वर्षे उलटूनही ट्रस्टकडून त्याबाबत कोणतीही पावती किंवा माहिती मिळालेली नाही. ती वीट नक्की कुठे गेली? आता या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे"

Shivsena donate silver brick of 4 KG to Ram Mandir Nyas
महागाईसह आता पासपोर्टचाही वाढणार खर्च!मुलांसाठीच्या शुल्कात झाली इतकी वाढ

राऊत पुढे म्हणाले, "जे मुख्य गुन्हेगार आहेत ते बाहेर आहेत, ते अद्यापही या ट्रस्टवर काम करत आहेत. तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवता आणि राम मंदिरात चोरी करता. तुम्ही मंदिराची दानपेटी चोरी करता.

हा पैसा राजकारणात येतो त्याच पैशानं तुम्ही आमदार-खासदारांना खरेदी करता आणि पक्ष फोडता. तेच राम मंदिराचे जे २००० कोटी रुपये तुम्ही चोरले आहेत, त्यातूनच तुम्ही आम आदमी पार्टीचे खासदार फोडले, तृणमूल काँग्रेसचे खासदार फोडले, शिवसेनेचे जे सहा खासदार तुम्ही फोडले त्यासाठी हा मंदिरातलाच लुटलेला पैसा वापरण्यात आला आहे."

Shivsena donate silver brick of 4 KG to Ram Mandir Nyas
Education Department : प्राथमिक शिक्षण विभाग सर्वांत भ्रष्ट; विधान परिषदेत सत्ताधारी-विरोधकांनी काढले वाभाडे

"शिवसेनेच्या सहा खासदाराना जे प्रत्येकी ५० कोटी रुपये दिलेत त्यासाठीचा पैसा हा एकनाथ शिंदेंकडं या राम मंदिराच्या दान पेटीतूनच आला असेल. त्याठिकाणी ते चोरीचा माल खूप मोठ्या प्रमाणावर दान देत होते तोच पैसा पुन्हा त्यांच्याकडं पाठवला असेल," अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर घणाघाती टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com