AAP sarpanch murder : मांडव रक्ताने माखला! AAP सरपंचाची भर लग्नात गोळ्या झाडून हत्या; हत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद!

AAP leader murder caught on CCTV : लग्नाच्या मांडवात गोळ्या झाडून AAP सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली. हा संपूर्ण थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
Jarmal Singh panjab news
Jarmal Singh panjab newsSarkarnama
Published on
Updated on

अमृतसरमधील एका आनंदाच्या सोहळ्याला रक्तरंजित वळण लागल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. लग्नाचा मांडव सजलेला असताना अचानक गोळीबार झाला आणि आम आदमी पार्टीच्या सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही संपूर्ण घटना रिसॉर्टमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली तर या घडनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पंजाबमधील तरन तारन जिल्ह्याशी संबंधित असलेले सरपंच जर्मल सिंह हे अमृतसर येथील मॅरीगोल्ड रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या लग्न समारंभासाठी उपस्थित होते. लग्नाच्या विधी शांततेत सुरू असताना अचानक दोन तरुण आत आले. कोणीही काही समजण्याच्या आतच त्यांनी जर्मल सिंह यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात जर्मल सिंह यांच्या डोक्यात गोळी लागली आणि ते गंभीर जखमी झाले.

Jarmal Singh panjab news
Ladki Bahin Yojana : मतदानाआधी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये येणार! लाडकी बहीण महापालिकेतही गेमचेंजर ठरणार?

घटनेनंतर उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. जर्मल सिंह यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

उपस्थितांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी किमान दोन गोळ्या झाडल्या आणि काही सेकंदांतच ते घटनास्थळावरून फरार झाले. जर्मल सिंह हे वधूपक्षाकडून या लग्नाला आले होते, तर वरात दिनानगर येथून आली होती. लग्न समारंभात कुटुंबीय, नातेवाईक आणि पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jarmal Singh panjab news
Congress VS Vanchit : वंचितच्या हट्टामुळे काँग्रेससमोर पेच, मतविभाजन अटळ; ठाकरेंचीही धाकधूक वाढली!

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जर्मल सिंह यांच्यावर यापूर्वीही अनेक वेळा हल्ले झाले होते. तरन तारन पोलिसांच्या नोंदींमध्ये त्यांच्यावर किमान तीन जुन्या हल्ल्यांची प्रकरणे नोंदवलेली आहेत. त्यामुळे या हत्येमागे जुना वाद किंवा शत्रुत्व असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com