Ladki Bahin Yojana : मतदानाआधी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये येणार! लाडकी बहीण महापालिकेतही गेमचेंजर ठरणार?

Muncipal Election : महापालिका निवडणुकीच्या मतदाच्याआधी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकत्रित देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
CM Ladki Bahin Yojana
CM Ladki Bahin Yojana Sarkarnama
Published on
Updated on

Ladki Bahin Yojana News : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा वेग आला आहे. 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यापूर्वीच सरकारने मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हफ्ते म्हणजे तीन हजार रुपये मतदानाच्याआधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

मकरसंक्रातीपूर्वी महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत. लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र महिलांनी केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती. आता ती मुदत संपली असल्याने केवायीस केलेल्या महिल्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

निवडणुकीच्याआधी पैसे जमा होत असल्याने महायुतीमधील तीनही पक्षांकडून महिलांसाठी आम्ही ही योजना राबवली असे सांगत लाभ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीमधी मित्रपक्ष काही ठिकाणी एकत्र लढत आहेत तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे या योजनेचा श्रेय घेण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही मित्रपक्षांमध्ये चढाओढ लागणार आहे.

CM Ladki Bahin Yojana
Uddhav Thackeray On Ameet Satam : 'मुंबईचे ममदानीकरण', साटम यांचा आरोप; उद्धव यांनी 'ठाकरी' शैलीत सुनावलं, 'कोण? चाटम.., चाटम का?'

बिहारमध्ये झालं ते महाराष्ट्रात होणार?

बिहार विधानसभा निवडणुकीत महिलांच्या खात्यात एका योजनेच्या अंतर्गत दहा हजार रुपये जमा करण्यात आले होते. त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला. भाजप-जेडीयूची सत्ता पुन्हा भाजपमध्ये आले. त्याच प्रकारे एकदम तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले तर त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

CM Ladki Bahin Yojana
Asaduddin Owaisi Rally : ओवेसींच्या सभेत गोंधळ, चेंगराचेंगरीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज, मोठी दुर्घटना टळली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com