Congress VS Vanchit : वंचितच्या हट्टामुळे काँग्रेससमोर पेच, मतविभाजन अटळ; ठाकरेंचीही धाकधूक वाढली!

BMC Election Vanchit Politics : काँग्रेस वंचितमध्ये मुंबईसाठी युती झाली आहे. मात्र, काही जागांवर एकमत होऊनही वंचितने थेट आपले उमेदवार उतरवल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे.
Harshwardhan Sapkal prakash ambedkar
Harshwardhan Sapkal prakash ambedkarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित यांच्यात युती झाली आहे. जागा वाटपाच्या करारानंतरही वंचितने पाच वाॅर्डत आपले उमेदवार कायम ठेवले आहेत. या वाॅर्डत काँग्रेसचे देखील उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीने मतविभाजन होणे अटळ मानले जात आहे.

वाॅर्ड 140, 181 आणि 116 सारख्या वॉर्डांत मतविभाजन झाल्याने त्याचा फायदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना होऊ शकतो. त्यामुळे ठाकरेंची देखील धाकधूक वाढली आहे. दरम्यान, या मतविभाजनामुळे मराठी मतदार हे ठाकरेंकडे अधिक आकृष्ट होतील, असे देखील सांगितले जात आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युती करून मुंबई महापालिका लढत आहे. मात्र, आपल्याकडे 16 जागांवर उमेदवार नसल्याचे सांगत वंचितने त्या जागा परत केल्या होत्या. मात्र. ऐनवेळी परत केलेल्या जागांवर काँग्रेसला देखील उमेदवार देता आले नाहीत. त्यामुळे त्या जागांवर काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार निवडणूक रिंगणात नाहीत.

Harshwardhan Sapkal prakash ambedkar
Asaduddin Owaisi Rally : ओवेसींच्या सभेत गोंधळ, चेंगराचेंगरीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज, मोठी दुर्घटना टळली!

दरम्यान, काँग्रेसने या 16 जागांबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून थेट काँग्रेस विचारांच्या अपक्ष उमेदवाराला पाठींबा देण्याच्या हालचाली सुरु केल्या तसेच जेथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार सक्षम असेल तेथे त्यांना समर्थन देत भाजपला रोखण्याची रणनीती आखली आहे.

शब्द ठाकरे बंधूंचा...

मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबईत मराठी माणसाला परवडतील या दरात एक लाख घरं बांधणार असल्याचे देखील आश्वासन दिले आहे.

Harshwardhan Sapkal prakash ambedkar
Narayan Rane : दोन मुलं राजकारणात स्थिरावली; आता भाजपचे राणे म्हणतात, 'नांदा सौख्य भरे'!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com