Arvind Kejriwal News : केजरीवालांचा डबल धमाका; गुजरातमध्ये हारुनही जिंकले

Arvind Kejriwal News : आप होणार देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

Arvind Kejriwal News : राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील महापालिका निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला दणदणीत विजय मिळाला. त्यानंतर या पक्षाने दुसऱ्याच दिवशी आणखी एक विक्रम केला आहे. गुजरात विधानसभामध्ये आपला जागा कमी मिळाल्या असल्या तरी त्यांनी चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला आहे. यामुळे देशातील राष्ट्रीय पक्षांची संख्या आता आठ वर पोहचली आहे.

गुजरातमध्ये आप (AAP) ने आतापर्यंत जवळपास 13 टक्के मते मिळवली आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडून याबाबतची घोषणा नंतर केली जाईल. दिल्ली, पंजाब आणि गोव्यात 'आप'ने आधीच राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा प्राप्त केला आहे. देशात आतापर्यंत आठ राष्ट्रीय पक्ष आहेत.

Arvind Kejriwal
Alpesh Thakor : पोटनिवडणूक हरलेल्या उमेदवाराचा त्याच मतदारसंघातून पुन्हा विजय

त्यामध्ये भारतीय शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस (Congress), तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय जनता पक्ष, असे फक्त सात राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत. त्यानंतर आता आपला मान्यता मिळणार आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाचे काही मापदंड आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो.

1) कुठलाही राजकीय पक्ष ज्याला किमान चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला असेल, अशा राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.

2) कुठलाही राजकीय पक्ष जो तीन वेगवेगळी राज्ये मिळून लोकसभेत २ टक्के जागा जिंकतो, म्हणजे किमान 11 जागा जिंकतो त्याला हा दर्जा मिळलतो. मात्र, लोकसभेच्या या 11 जागा तीन वेगवेगळ्या राज्यातीलच हव्यात, एका राज्यातील नाही.

Arvind Kejriwal
शिक्षिकेची नोकरी सोडून निवडणूक लढवली अन्‌ भाजपच्या बड्या नेत्याचा पराभव केला!

3) एखादा राजकीय पक्ष ज्याच्याकडे लोकसभेच्या ४ जागांशिवाय विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये ६ टक्के मते मिळली असेल, अशा पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. तीन पैकी कोणतीही एक अट पूर्ण केली असले तरी निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com