Congress workers protest : काँग्रेस कार्यकर्त्यांचा नागपूर महापालिकेच्या आवारात राडा; कुंड्या फेकत व्यक्त केला रोष!

Nagpur Municipal Corporation news : काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेवर धडक दिली.
Congress Nagpur
Congress Nagpursarkarnama
Published on
Updated on

Congress Nagpur agitation : विधानसभेच्या निवडणुकीत मोठा पराभव झाला असला तरी नागपूर शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला नाही. महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेवर हल्लाबोल केला. जोरदार घोषणाबाजी करून महापालिकेच्या मुख्यालयात कुंड्या फेकून प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला.

काँग्रेसचे(Congress) नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व शहर व जिल्हा प्रमुखांना आपआपल्या शहतील ज्वलंत विषय घेऊन आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेवर धडक दिली.

Congress Nagpur
Nagpur political News : विधानपरिषदेवर नागपूरमधून कोण जाणार? कोहळे, जोशी, ठाकरेंच्या नावाची जोरदार चर्चा

नागपूर महानगर पालिकेत सुमारे अडीच वर्षांपासून प्रशासक आहे. लोकप्रतिनिधींचे ऐकत नाही, माजी नगरसेवकांच्या सूचनांकडे लक्ष देत नाही, लोकांची कामे होत नाही आणि छोट्यामोठ्या कामांकडे प्रशासन दुर्लक्ष करते याचा रोष आधीपासूनच होता. यातच रस्त्यांवर जागोजागी पडलेले गड्डे, वाढीव टॅक्स, कचऱ्याचे गाड्यांची अनियमिततेकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

सुमारे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या मुख्यालयात धडकले. मुख्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. महापालिका मुर्दाबादची नावे लागवी. त्यामुळे जोशात आलेल्या कार्यकर्त्यांनी कुंड्या उचलून फेकणे सुरू केले. परिणामी चांगलीच तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

Congress Nagpur
Ravikant Tupkar : क्रांतिकारी शेतकरी संघटनेने वाढवले महायुतीचे टेन्शन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिला अल्टीमेटम

महापालिका आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस आणि भाजपच्या(BJP) कार्यकर्त्यांचा आधीपासूनच रोष आहे. हिवाळी अधिवेशात विकास ठाकरे आणि भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी त्यांना बदलण्याची मागणी केली होती. तत्पूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा महापालिका आयुक्तांना बदलण्याची मागणी केली होती.

हाच मुद्दा पकडून विकास ठाकरे(Vikas Thakre) यांनी महायुती सरकारकडे केंद्रीय मंत्र्यांचे तरी ऐका अशी मागणी विधानसभेत केली होती. ठाकरे आणि दटके यांनी कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटदाराच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. कचरा संकलनाचे कंत्राट रद्द करण्याची मागणी भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनी केली आहे. मात्र अद्याप महापालिका प्रशासनाने यावर निर्णय घेतलेला नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com