Accident news : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपात्कालीन लॅंडिग

हेलिकॉप्टरने उड्डाण करताना पायलटला इंजिनमधून काही आवाज ऐकू आले.
Accident news
Accident news

CM Shivrajsingh Chouhan : मध्य प्रदेशमधून एक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हेलिकॉप्टरचे ‘इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील मनवर येथे निवडणूक सभेतून परतत असताना हा प्रकार घडला.

शिवराज सिंह चौहान यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड झाला. हेलिकॉप्टरने उड्डाण करताना पायलटला इंजिनमधून काही आवाज ऐकू आले. हेलिकॉप्टर हवेतच फिरू लागले. पण पायलटने प्रसंगावधान राखत मनवरमध्येच हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग केले. यानंतर सीएम शिवराज सिंह कारमध्ये बसून धारकडे रवाना झाले.

सीएम शिवराज सिंह यांनी मंचावरून आपल्या हेलिकॉप्टरने आकाशात काय घडले ते सांगितले. 20 जानेवारीला मनवरमध्ये पालिकेच्या 15 प्रभागात निवडणूक होणार प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठीशिवराजसिंह चौहान यांनी रविवारी कामगार परिषद आणि भाजपच्या नगरसेवक उमेदवारांच्या समर्थनार्थ बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

Accident news
Congress : मोठी बातमी! काँग्रेसमधून सुधीर तांबे यांचे निलंबन

सीएम शिवराज सिंह यांनी मनवरमध्ये सुमारे 35 मिनिटे सभेत संबोधित केले. यानंतर ते धारकडे रवाना झाले. सभेच्या ठिकाणापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हेलिपॅडवर उभे होते. ते हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर एक किलोमीटर दूर गेले असतानाच हेलिकॉप्टरचे इंजिन आवाज करू लागले, प्रसंगावधान राखत पायलटने हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवल्याचे राकेश पाटीदार यांनी सांगितले.

सीएम शिवराज सिंहांनी सांगितलं आकाशात काय घडलं?

मनवरहून कारने धार जिल्ह्यातील पिथमपूरला पोहोचलेले मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी मनावरच्या आकाशात त्यांच्या हेलिकॉप्टरचे काय झाले ते सांगितले. इंदोरामाच्या सभेला उशीरा आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आधी माफी मागितली. पुढे सांगताना ते म्हणाले की, मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. माझी चूक नाही, मनवरहून निघताच हेलिकॉप्टर टेक ऑफ झाल्यावर हवेत थरथरू लागले, परिस्थिती अशी होती की मी धारला पोहोचू शकलो नाही.

पायलटने हेलिकॉप्टरमध्ये काही बिघाड झाल्याचे सांगितले. आम्हाला आधी वाटलं आता देवाला वाटेल ते होईल. पण पायलटने हेलिकॉप्टरने मनमध्येच हेलिकॉप्टर उतरवले आणि आमचा जीव वाचला. आम्ही आधी रस्त्याने धारला आलो आणि तिथून इंदोरामाला पोहोचलो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या पण या थंडीत तुम्ही लोक रात्री उशिरापर्यंत माझी वाट पाहत बसलात. तुमचा तुमच्या या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com