
Karnataka Politics News : सोने तस्करी प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या अभिनेत्रीचे भाजप कनेक्शन समोर आले आहे. या अभिनेत्रीला भाजप सरकारच्या काळात जमीन दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता राजकारण तापले आहे. या अभिनेत्रीला आठवडाभरापूर्वी तब्बल साडे बारा कोटी रुपये किंमतीचे सोने तस्करी करताना रंगेहाथ पकडले आहे.
रन्या राव असे या अभिनेत्रीचे ना असून तिला कर्नाटक पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. ही अभिनेत्री कर्नाटकातील एका बड्या पोलिस अधिकाऱ्याची सावत्र मुलगी आहे. आता तिचे भाजप कनेक्शनही समोर आले आहे. कर्नाटक औद्योगिक विकास महामंडळाने रविवारी याबाबत माहिती दिली आहे.
भाजपचे सरकार असताना जानेवारी 2023 महिन्यात रन्या हिला स्टील प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकारने जमीन दिली होती. त्यानंतर काही महिन्यांत राज्यात काँग्रेसचे सरकार आले. मंडळाने रन्याला 12 एकर जमीन दिली होती. कर्नाटकचे उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांच्या कार्यालयाकडून रविवारी जमीन प्रकरणाची माहिती माध्यमांना देण्यात आली. त्यानुसार सरकारने रन्याला जमीन देण्याबाबत फेब्रुवारी 2023 मध्ये नोटिफिकेशन काढले होते. टुमकूर जिल्ह्यात ही जमीन देण्यात आली होती.
दरम्यान, रन्याला सोने तस्करी प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर ही बाब समोर आली. तिला 3 मार्चला कर्नाटकातील कंपेगौडा विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या घराची झाडीझडती घेतल्यानंतर 2.06 कोटी किंमतीचे दागिने आणि 2.67 कोटी रुपयांची रोकड सापडल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली होती.
रन्या हिने यापूर्वीही अनेकदा सोने तस्करी केली आहे. त्यासाठी तिने सुरक्षा यंत्रणांपासून सुटका करून घेण्यासाठी दबाव टाकला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तिचे वडील रामचंद्र राव हे डीजीपी रँकचे अधिकारी असून सध्या कर्नाटक राज्य पोलिस हाऊसिंग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. आता भाजप सरकारने तिच्यावर मेहेरबानी केल्याचेही समोर आले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.