Who Sanjay Raut Ajit Pawar Ask in Pune Press Conference : राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांनी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. 'या सर्व अफवा आहेत,' असे अजित पवार यांनी सांगितले आहे. पण त्यानंतरही याबाबत अजितदादांना आज (शुक्रवारी) पत्रकारांनी विचारले असता ते पत्रकारांवर उखडले. खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत अजित पवार यांना विचारले असता, अजितदादा काहीसे संतप्त झाले, त्यांनी 'कोण संजय राऊत'असा उलट प्रश्न पत्रकारांना केला. राऊतांवर त्यांनी निशाणा साधला.
महाविकास आघाडीची मांडणी करण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अजित पवार आणि त्यांच्या सुरु असलेल्या वादामुळे सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. अजित पवार-संजय राऊत वाद कायम असल्याचे चित्र आहे.
अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. "तुम्ही सांगितल्यानंतरही संजय राऊत हे सल्ले देत आहेत, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी हे वक्तव्य केले.
'सामना'च्या रोखठोकमधून संजय राऊत यांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फुटीच्या मार्गावर असल्याचे भाष्य केले होते. याबाबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा संदर्भ दिला होता. राऊतांनी दिलेल्या या माहितीला अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये 'रोखठोक'उत्तर दिले होते.
तेव्हा अजित पवारांनी राऊतांचे नाव न घेता आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचा तुम्हाला कोणी वकील पत्र दिले आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर राऊतांनी अजितदादंना सुनावलं होतं, ते म्हणाले, 'मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, मी अजित पवारांचे का ऐकून घेऊ, माझ्यासाठी शरद पवारांची भूमिका महत्वाची आहे. मी फक्त शरद पवार यांचेच ऐकतो," "शिवसेना फुटली तेव्हा मी आमचीच वकील केली," अशा शब्दात संजय राऊतांनी अजित पवारांना सुनावलं.
"मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं...
आज पत्रकारांनी या विषयावर अजित पवार यांनी विचारले , तेव्हा अजित पवारांनी राऊतांना चांगलेच सुनावलं. "मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं. कुणी अंगाला का लावून घ्यावं,मी माझ्या पक्षासंदर्भात बोललो होतो." असे सणसणीत टोला अजित पवारांनी राऊतांना लगावला. अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात दोन दिवसापासून सुरु असलेले शाब्दीक युद्ध अद्याप सुरुच आहे. आता संजय राऊत अजितदादांना काय उत्तर देतात, हे लवकरत समजेल. 'पत्रकारांनी त्यांच्या मनातील शंका-कुशंका डोक्यातून काढून टाका,' असे अजित पवार म्हणाले.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.