मी कोंडीत अडकलोय, ज्याची कल्पनाही केली नव्हती; अदर पूनावालांची मोठी घोषणा

केंद्र सरकारने लशीची ऑर्डर दिली नसल्याने पूनावाला यांनी हतबलता व्यक्त केली आहे.
Adar Poonawalla
Adar Poonawalla Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : जगभरात ओमिक्रान (Omicron) या कोरोनाच्या (Corona) नव्या प्रकारानं चिंतेचे वातावरण आहे. भारतात याचे विषाणुचे रुग्ण आढळल्याने सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. लसीकरण (Vaccination) वाढवण्यासाठी मोदी सरकारकडून (Modi Government) प्रयत्न केले जात आहेत. त्यातच कोविशिल्ड (Covishield) या लशीचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी हतबलता व्यक्त केली आहे.

पूनावाला यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पूनावाला यांनी लशीचे उत्पादन जवळपास निम्म्याने कमी करणार असल्याचे जाहीर केले आहे. पुढील आठवड्यापासून उत्पादनात घट केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारने आतापर्यंत दिलेल्या सर्व ऑर्डर पूर्ण केल्या आहेत. आता सरकारकडून एकही ऑर्डर नसल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगत पूनावाला यांनी हतबलता दर्शवली.

Adar Poonawalla
काँग्रेसची धुळधाण; राणे ते नाईक...17 आमदारांचा आकडा आला तीनवर

मी कधी कल्पनाही केली नव्हती, एवढा कोंडीत अडकल्याचे सांगत पूनावाला म्हणाले, 'आम्ही एका महिन्यात लशीचे 25 कोटी डोस उत्पादित करत आहोत. पण भारताने मोठ्या लोकसंख्येला डोस दिले आहेत, हे चांगली गोष्ट आहे. आम्ही आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सर्व ऑर्डर पूर्ण केल्या आहेत. आता नव्याने ऑर्डर नसल्याने उत्पादन कमी करणार आहोत.'

बूस्टर डोस देण्याबाबत निर्णय झाल्यास लशींची गरज मोठ्या प्रमाणावर भासेल. याबाबत आधीच केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. आम्ही त्यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत. सध्या लशीच्या 50 कोटी डोसचा साठा आहे. यातील अर्धा साठा दोन महिन्यांत संपेल. लसीची साठवणूक करण्याचा कालावधी नऊ महिन्यांचा आहे. त्यामुळे साठा करण्याबाबत निश्चित निर्णय घ्यावा लागणार असल्याचे पूनावाला यांनी मुलाखतीत सांगितले.

Adar Poonawalla
परमबीरसिंह प्रकरणात ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

पुढील तिमाहीत लशीची निर्यात वाढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. आठ महिने आम्ही निर्यात करू शकलो नाही. इतर देशांनी अमेरिका व अन्य ठिकाणांहून मदतीच्या स्वरूपात लस मिळवली. त्यामुळे आमचं मोठं मार्केट कमी झालं. आता आम्ही पुढील पहिल्या तिमाहीत या ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं सांगताना पूनावाला यांनी भारतासाठी लशीचा साठा करण्याबाबत आधीच सांगावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मागील वर्षी देशात अचानक लशीच्या कोट्यवधी डोसची मागणी वाढली. अशी स्थिती पुन्हा यायला नको आहे. पण उत्पादन कमी केल्यास पुन्हा तेवढे उत्पादन अचानक वाढवून मागणी पूर्ण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आम्ही सरकारला याबाबत लवकरच मार्गदर्शन कऱण्याचा आग्रह केला आहे. बूस्टर डोससाठी लस भासल्यास त्याचे उत्पादन करून साठा करता येईल. याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com