Supreme Court hearing : सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण : तर शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नसते...

Shivsena News : उद्या पुन्हा युक्तीवाद होणार आहेत. न्यायालयातील आजची सुनावणी संपली आहे.
Supreme Court Hearing
Supreme Court Hearing Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Supreme Court hearing News : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. न्यायालयात शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने युक्तीवाद सुरु आहे. शिंदे गटाचे ज्येष्ट वकिल निरज किशन कौल यांनी आज युक्तीवाद केला. उद्या पुन्हा युक्तीवाद होणार आहेत. न्यायालयातील आजची सुनावणी संपली आहे.

या दरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, आम्हाला ही सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. वेळेत युक्तीवाद झाले तर होळीच्या सुट्टीपूर्वी हे प्रकरण संपवायचे आहे. तसेच न्यायाधीशांनी कौल यांना आपला युक्तीवाद पूर्ण करण्याची सूचना केली. तसेच शिवसेनेच्या इतर वकिलांनी उद्यापर्यंत युक्तीवाद पूर्ण करावा, असेही न्यायाधीशांनी सांगितले.

Supreme Court Hearing
Supreme Court hearing : ...म्हणून आम्ही राज्याबाहेर गेलो; शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले कारण

शिवसेनेच्या (Shivsena) वतीने युक्तीवाद करताना नीरज कौल म्हणाले, 42 आमदारांविरोधातली अपात्रतेच याचिका प्रलंबित आहे. या आमदारांना वगळले तरीही उद्धव ठाकरे यांच्याकडे बहुमताचा आकडा नव्हता. बहुमत नसलेला व्यक्ती कसा काय मुख्यमंत्रीपदी राहू शकतो. अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा सवाल कौल यांनी केला.

तसचे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यासाठी महाविकास आघाडीच्या तेरा सदस्यांनी दांडी मारली. त्यांचा स्वतःच्या सदस्यावर विश्वास राहिला नव्हता, असा दावाही यावेळी कौल यांनी केला. मात्र, विधानसभेच्या अध्यक्षांनी 39 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई केली असती, तर चित्र वेगळे असते. महाविकास आघाडी सरकार सत्तेत राहिले नसते. मात्र, सारा पट वेगळा राहिला असता, असे महत्त्वापूर्ण निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले.

विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले नाही, म्हणून सरकार स्थापन करण्याची संधी मिळाल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. तो एका अर्थाने योग्य असल्याचे निरीक्षण, यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नोंदवले. तसेच जर समजा 39 आमदार अपात्र ठरले असते तर शिंदे मुख्यमंत्री झाले नसते, असेही न्यायालयाने म्हटले.

Supreme Court Hearing
Supreme Court hearing : सत्तासंघर्षावरील निर्णयासंदर्भात सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे विधान; युक्तीवाद लवकर पूर्ण करण्याची सूचना

21 तारखेला आम्हाला नोटीस पाठवली होती. त्यात बैठकीला हजर राहण्याचे आदेश होते. आम्ही या बैठकीला उपस्थित नव्हतो. हाच आमच्याविरुद्ध आरोप आहे. आम्ही फक्त दोन बैठकींना गैरहजर राहिलो. त्या आधारावर ते आम्ही स्वेच्छने सदस्यत्वाचा त्याग केल्याचे सांगत आहेत, असा युक्तीवाद कौल यांनी कैला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court
Former Supreme Court judge Sanjay Kishan Kaul has made claims about discussions between former CJI D.Y. Chandrachud and the government over judicial appointments.
Uddhav Thackeray, Eknath Shinde News
Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court