Atul Londhe : काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंच्या अडचणी वाढणार?; भाजपच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल!

FIR against Atul Londhe : जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण अन् अतुल लोंढेंच्या विरोधात कुठं दाखल झाल्या गुन्हा?
Atul Londhe
Atul LondheSarkarnama
Published on
Updated on

BJP complaint against Atul Londhe : काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते खोटे वक्तव्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारची बदनामी करीत असल्याची तक्रार भाजपच्यावतीने दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी लोंढे यांच्याविरुद्ध बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमक्या देणाऱ्या प्रशांत कोरटकरला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालायतील एका कर्मचाऱ्याने मदत केली असल्याचे वक्तव्य लोंढे यांनी केले होते आणि याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी करावा अशी मागणी एका वृत्तवाहिनीवर केली होती. सोबतच ‘एक्स' पोस्‍टसुद्धा टाकली होती. मात्र लोंढे यांनी ज्या कर्मचाऱ्याचे नाव घेतले त्या नावाचा कुठलाच कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात कार्यरत नाहीत.

Atul Londhe
Karuna Sharma On Dhananjay Munde : तो गंभीर आरोप अन् धनंजय मुंडेंवर बोलता बोलता करुणा मुंडे ऑनकॅमेरा ढसाढसा रडल्या

''अतुल लोंढे(Atul Londhe) यांचे आरोप खोटे आहेत. ते जनतेची दिशाभूल करून मुख्यमंत्री आणि राज्य सरकारची बदनामी करीत आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून राज्यातील शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत.'' अशी तक्रार भाजपच्यावतीने शुक्रवारी रात्री करण्यात आली होती. त्याची दाखल नागपूरमधील गणेशपेठ पोलिसांनी घेऊन लोंढे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोंढे यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा जामिनपात्र असला तरी त्यांना पोलिस ठाण्यात आपले म्हणणे मांडण्यासाठी यावे लागणार आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसचे(Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य शासन आणि मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबासोबत केली होती तर लोंढे यांनी कोरटकरला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामार्फतच अप्रत्यक्षपणे मदत केली जात होती असे सुचित केले होते. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.

Atul Londhe
Atul Londhe : काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना भाजपने दिली वाढदिवसाची ‘विशेष’ भेट!

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये मोठी दंगल उसळली होती. तणाव निर्माण झाला होता. यामुळे आधीच नागपूरचे वातावरण तापले असताना आता लोंढे यांच्यामुळे त्यात आणखी भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com