Hindu Temple Vandalized : हिंदूंनो परत जा! मोदींची पाठ फिरताच अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला

Narendra Modi America Hindu Mandir : अमेरिकेतील सॅक्रामेंटो येथील स्वामी नारायण मंदिरात तोडफोड करण्यात आली आहे.
Hindu Mandir
Hindu MandirSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांपूर्वीच अमेरिका दौऱ्यावर भारतात परतले आहेत. त्यांची पाठ फिरताच अमेरिकेतील एका हिंदू मंदिरात तोडफोड करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या भिंतींवर हिंदूनो परत जा, असे लिहिण्यात आले आहे. मंदिरांवर हल्ला करण्याच्या घटना थांबताना दिसत नाहीत.

अमेरिकेतील सॅक्रामेंटो येथील स्वामी नारायण मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. कट्टरपंथियांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे तेथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण जाले आहे. सॅक्रामेंटो ही कॅलिफोर्नियाची राजधानी आहे. स्वामी नारायण मंदिरावरील हल्लाची ही अमेरिकेतील दुसरी घटना आहे.

Hindu Mandir
Sanjay Raut : मोठी बातमी : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी; कोर्टाने ठोठावली शिक्षा

दहा दिवसांपूर्वीच न्यूयॉर्क येथील मंदिरात तोडफोड करण्यात आली होती. तसेच भिंतींवर हिंदूविरोधी नारेही लिहिण्यात आले होते. भारतीय दूतावासाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. पुन्हा झालेल्या घटनेबाबत BAPS या हिंदू संघटनेकडून निवेदन जारी करण्यात आले आहे.

BAPS ने म्हटले आहे की, न्यूयॉर्कमधील BAPS श्री स्वामीनारायन मंदिरात तोडफोडीनंतर दहा दिवसांपेक्षाही कमी कालावधीत सॅक्रामेंटोमधील आमच्या मंदिराला अपवित्र करण्यात आले. द्वेषपूर्ण घोषणा देत मंदिरात तोडफोड कऱण्यात आली. याचा आम्ही निषेध करतो. याचे आम्हाला तीव्र दु:ख आहे.

Hindu Mandir
Rahul Gandhi : राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? हायकोर्टाची थेट गृह मंत्रालयाला नोटीस

दरम्यान, सॅक्रामेंटो काऊंटीचे प्रतिनिधित्व करणारे खासदार अमी बेरा यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. लोकांना असहिष्णुतेविरोधात पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. सॅक्रोमेंटोमध्ये धार्मिक कट्टरता आणि द्वेषासाठी कोणतीही जागा नाही. सर्वांनी मिळून असहिष्णुतेविरोधात उभे राहायला हवे. आपल्या समाजात प्रत्येक धर्मातील लोकांना सुरक्षित आणि सन्मानित वाटायला हवे, असेही अम् बेरा यांनी म्हटले आहे.

यापूर्वीही झालेत हल्ले

अमेरिकेसह कॅनडामध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले आहेत. जुलै महिन्याच्या सुरूवातीला कॅनडातील एडमॉन्टन येथील स्वामीनारायण मंदिरात तोडफोड करण्यात आली होती. दहा दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमधील मेलविले येथील स्वामीनारायण मंदिरात तोडफोड झाली होती. तर आता सॅक्रामेंटो येथील मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com