Sanjay Raut : मोठी बातमी : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी; कोर्टाने ठोठावली शिक्षा

Medha Somaiya : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी हा खटला दाखल केला होता.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का बसला आहे. एका अब्रुनुकसानीच्या खटल्यात मुंबईतील शिवडी कोर्टाने त्यांना दोषी धरत शिक्षा ठोठावली आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊतांविरोधात हा खटला दाखल केला होता. याप्रकरणी कोर्टाने राऊतांना 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली असून 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राऊतांना तुरुंगात जावे लागणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

काय आहे प्रकरण?

संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. 2022 सालचे हे प्रकरण आहे. त्यावर आपल्यावरील आरोप निराधार आणि अवमानकारक असल्याचे म्हणत मेधा सोमय्या यांनी राऊतांवर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. शिवडी न्यायायालयात यावर सुनावणी झाली.

राऊतांनी 12 एप्रिल 2022 रोजी सामना वर्तमानपत्रातील लेखात लिहिले की, मेधा सोमय्या यांनी राजकीय ताकदीचा वापर केला. तसेच मीरा-भाईंदर परिसरातील 154 पैकी 16 शौचालये बांधण्याचे कंत्राट घेतले. या कंत्राटाचा वापर करून मेधा सोमय्या यांनी 3 कोटी 90 लाखांचा घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यावर मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात मानहानीचा अर्ज दाखल केला होता.

या खटल्यात कोर्टाने संजय राऊतांना दोषी धरल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. आता तुरुंगवास टाळण्यासाठी राऊतांना जामीनासाठी अर्ज करावा लागणार आहे. तसेच ते वरिष्ठ कोर्टातही या निकालाविरोधात दाद मागू शकतात. राऊत सध्या दिल्लीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com