Abhishek Singh : पूजा खेडकर यांच्यानंतर माजी IAS वादात; डान्सचे व्हिडिओ आणणार अडचणीत?

Pooja Khedkar IAS Disability Certificate : पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होत आहे. यापार्श्वभूमीवर त्यांची चौकशी सुरू आहे.
Abhishek Singh
Abhishek SinghSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वाद ताजा असतानाच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वीच सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकाऱ्याने दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र दिल्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

अभिषेक सिंह असे या माजी IAS अधिकाऱ्याचे नाव आहे. ते 2011 च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी सेवेला रामराम ठोकल्याची चर्चा होती.

दरम्यान, अभिषेक शर्मा यांनी UPSC ला गतीशिलता अक्षमता (Locomotor Disability) म्हणजे चालण्या-फिरण्यात मर्यादा असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यामुळे त्यांची दिव्यांग कोट्यातून निवड झाली होती. पण आता त्यांचा जिममधील तसेच डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या दिव्यांगत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Abhishek Singh
Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा ‘X’ वर नवा रेकॉर्ड; राहुल गांधींसह इतर नेते जवळपासही नाहीत...

एक्स वर रोशन राय यांनी यूपीएसएसची निवड यादी व अभिषेह सिंह यांचा जिममधील एक फोटो ट्विट पोस्ट केला आहे. निवड यादीमध्ये सिंह यांची दिव्यांग गटातून निवड झाल्याचे दिसते. त्यावरून राय यांनी निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे. अभिषेक सिंह यांनी सोशल मीडियात होत असलेल्या चर्चांवर खुलासा केला आहे.

Abhishek Singh
Yodi Adityanath : लोकसभेतील झटक्यानंतर योगींचा पहिलाच बूस्टर डोस; म्हणाले, बॅकफूटवर...

सुरूवातीला माझ्या जातीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर मी नोकरी परत मागत असल्याचे बोलले गेले. आता म्हणत आहेत मी आरक्षणातून नोकरी मिळवली. पण मी जे काही मिळवले आहे ते आरक्षणाच्या जीवावर नाही. माझे वडील आयपीएस अधिकारी होते, त्याचा मला फायदा झाला, असेही बोलले गेले. माझ्या कुटुंबात अनेकांनी यूपीएसी परीक्षा दिली. पण कुणालाच य़श मिळाले नाही. मी घरातील एकमेव आयएएस आहे, असे सिंह म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com