पंतप्रधानांच्या आवाहनानंतर राहुल गांधीनी बदललेल्या डीपी'ची चर्चा | Rahul Gandhi news

Rahul Gandhi | PM Narendra Modi| पंतप्रधान मोंदी यांनी स्वत: त्यांच्या सोशल मिडीयाचे डीपी बदलून राष्ट्रध्वज ठेवला.
PM Narendra Modi| Rahul Gandhi |
PM Narendra Modi| Rahul Gandhi |
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (NarendraModi) यांनी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाची घोषणा केली होती. या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात 'हर घर तिरंगा' अभियानही राबवण्यात येत आहे. या 'हर घर तिरंगा' अभियानानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या सोशल मीडियावरील खात्यांचे डीपी बदलवून राष्ट्रध्वजाचा (National Flag) फोटो ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर पंतप्रधान मोंदी यांनी स्वत: त्यांच्या सोशल मिडीयाचे डीपी बदलून राष्ट्रध्वज ठेवला.

नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीदेखील प्रतिसाद दिला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलचा डीपी बदलून माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा फोटो लावला आहे. राहुल गांधी यांनी माजी जवाहरलाल नेहरू यांचा राष्ट्रध्वज हातात घेतलेला फोटो डीपीमध्ये ठेवला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ”तिरंगा हा देशाचा अभिमान आहे. तो प्रत्येक नागरिकाच्या हृदयात आहे”, असेही कॅप्शन दिले आहे. राहुल गांधींना डीपी बदलल्यापासून नेहरूंचा तिरंगा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहरूंचा फोटो लावून काँग्रेसने आपल्या पद्धतीने प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे.

PM Narendra Modi| Rahul Gandhi |
Eknath Shinde गटाचे काय होणार? : हरिश साळवे यांच्यावर आता अखेरची भिस्त!

दरम्यान, आज सांस्कृतिक मंत्रालयातर्फे तिरंगा बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायड यांनी तिरंगा रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. ही रॅली लाल किल्ल्यावरून विजय चौकापर्यंत काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपी बदलल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी आपापले डिपी बदलण्यास सुरुवात केली आहे. देशभरातील सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, भाजप नेते यांच्याशिवाय सर्वसामान्यांनीही आपले डीपी बदलले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com