Aaditya Thackeray On Rahul Gandhi Verdict: राहुल गांधींना 'सुप्रीम' दिलासा; आदित्य ठाकरेंचा जल्लोष

Rahul Gandhi Defamation Case : सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली
Aditya Thackeray, Vijay Wadettiwar
Aditya Thackeray, Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : काँग्रेस नेते, माजी खासदार राहुल गांधी यांची दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे काँग्रेसच्या गोटात जल्लोष केला जात असून 'इंडिया'तील घटक पक्षांतील कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. मुंबईत ठाकरे गटाचे आमदार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना जिलेबी भरवत राहुल यांना मिळालेल्या दिलासाचा आनंद व्यक्त केला आहे. (Latest Political News)

राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती मिळताच राज्यभर काँग्रेसने आनंदोत्सव साजरा केला. या निर्णयामुळे राहुल गांधी लोकसभेत पुन्हा हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गांधींमुळे लोकसभेतील विरोधी पक्षांच्या आघाडीचा आवाज बुलंद होणार आहे. आदित्य ठाकरेंनी आता विरोधी बाकावर बसून नाही तर सत्तेत येऊन काम करण्याचा इरादा बोलून दाखवला. या निर्णयामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याची प्रतिक्रिया 'इंडिया'तील नेते देत आहेत.

Aditya Thackeray, Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar On Supreme Court : '' कायद्याच्या चौकटी मोडणाऱ्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच बंदोबस्त केला; वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा

राहुल गांधी यांच्याविरुद्ध २०१९ मधील 'मोदी आडनाव' टिप्पणीबद्दल गुन्हेगारी मानहानीचा खटला दाखल झाला होता. यामुळे राहुल यांच्यावर खासदारकी गमावण्याची आणि पुढील सहा वर्षे निवडणूक न लढवण्याची नामुष्की आली होती. याच खटल्याला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. तसेच त्यांची टिप्पणी विशेषत: सार्वजनिक जीवनातील व्यक्तीसाठी चांगली नसून यापुढे ते काळजी घेतील, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली. या खटल्यात जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा एक दिवस कमी असती तरी त्यांची खासदारकी रद्द झाली नसती, असेही निरीक्षण यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

Aditya Thackeray, Vijay Wadettiwar
Pune Politics : मावळात विक्रांत, शिरूरला राजेश पांडे, तर बारामतीत जालिंदर कामठे भाजपच्या `महाविजय` चे समन्वयक

यापूर्वी राहुल गांधींच्या शिक्षेला गुजरात उच्च न्यायालयाने गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. यानंतर शेवटची संधी म्हणून गांधींनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावेळी त्यांच्या वकिलाने युक्तिवाद करताना सांगितले की, राहुल यांना संसदेत उपस्थित राहून निवडणूक लढवण्याची परवानगी मिळेल. उच्च न्यायालयाने ६६ दिवसांसाठी आपला निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणात दोषी आढळल्यामुळे गांधी यांनी यापूर्वीच संसदेची दोन अधिवेशने गमावल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com