MLA Funds News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विकासकामांच्या निधीवरून होणारे राजकारण आणि भ्रष्टाचार याचा पर्दाफाश विधान परिषदेत केला. सध्या राज्यात कामे न करताच बीले काढण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. (Ajit Pawar`s Office offer Eknath Khadse 25 Crores Funds for Works in constituency)
विधान परिषदेत विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यालयातून निधीसाठी कसे प्रकार झाले, याची माहिती दिली.
या चर्चेत श्री. खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यातील अधिकारी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला.
ते म्हणाले, सध्या राज्यात अनेक मोठ्या घोषणा होतात. ती कामे दिसत का नाहीत?. याचा शोध मी घेतला असता, जळगाव जिल्ह्यात माझ्या मतदारसंघात जी कामे आधीच झाली, त्यावर नव्याने बीले काढण्यात आली.
कामे न करताच बीले काढण्याचा अत्यंत प्रकारसुरू आहे. अर्थसंकल्पातील बराच निधी जिरवण्याचे काम होत आहेत. त्यामुळे निधी खर्च होतो, मात्र कामे दिसत नाहीत.
ते म्हणाले, याबाबत एक धक्कादायक प्रकार घडला. बरेच लोक सरकारमध्ये सहभागी झाले, त्यादरम्यान मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून फोन आला. त्यात तातडीने पंचवीस कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव पाठवा असे सांगितले.
त्यांना वाटले असावे मी देखील त्यांचाच असावा. सतत दोन तीन दिवस फोन येतच होते. अगदी प्रस्ताव कसे पाठवायचे हे देखील सांगितले जात होते. कामे झाली नाही तरी चालेल, निधी मंजूर होतो आहे, असा हा गंभीर प्रकार आहे.
ते पुढे म्हणाले, जर राज्य सरकार व्यवस्थित असेल, तर दोन वर्षांपूर्वी कंत्राटदारांनी जी कामे केली, त्यांची बीले त्यांना का मिळत नाहीत?. त्यांना राज्यभर आंदोलन का करावे लागते आहे?. त्यांचे पैसे द्यायला सरकारकडे पैसेच नाहीत. ११ हजार कोटींची देणी आहेत. दिलेत फक्त ३०० कोटी. एकंदर तीस हजार कोटींचे देणे आहे. त्यामुळे राज्यातील कंत्राटदार उपोषण करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.