Agnipath Scheme : सत्तेवर आल्यास 'ही' योजना रद्द करणार; काँग्रेसची मोठी घोषणा

Mallikarjun Kharge : ज्या योजनेची देशाला गरज नाही, ज्यामुळे लाखो युवकांचे आयुष्य पणाला लागले ती योजना काँग्रेस बंद करणार
Mallikarjun Kharge, Narendra Modi
Mallikarjun Kharge, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi Political News :

'इंडिया' आघाडीनं येत्या लोकसभा निवडणुकात जोर लावण्याचा निर्धार केला आहे. भाजपला हरवण्यासाठी 28 विरोधक एकत्र आले आहेत. आणि भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखणे हाच त्यांचा मुख्य अजेंडा आहे. सत्तेवर आलेल्यावर भाजपने सुरू केलेली आणि युवकांचं भविष्य टांगणीला लावणारी मोठी योजना रद्द करण्याची तयारी काँग्रेसनं केली आहे. तसं पत्र काँग्रेसनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांना पाठवलं आहे.

Mallikarjun Kharge, Narendra Modi
Arvind Kejriwal News : कबुलीनंतर केजरीवालांच्या ‘त्या’ चुकीला माफी? सुप्रीम कोर्टाकडून दिलासा...

अग्निपथ योजना (Agnipath military recruitment scheme) ही सैन्यभरतीची भाजपने सुरू केलेली योजना आहे. या योजनेमुळे युवकांचं भवितव्य अधांतरी आहे, असा काँग्रेसचा दावा आहे. म्हणूनच सत्तेवर आल्यावर अंदाजे दोन लाख युवकांना सैन्यभरतीच्या अनिश्चिततेच्या जोखडातून मुक्त करण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून सैन्यभरतीची अग्निपथ योजना युवकांच्या भविष्याशी खेळणारी असल्याचा दावा केला आहे. देशातील दोन लाख युवकांना सैन्यभरतीची संधी असते, पण कंत्राटी पद्धतीवरील आणि शॉर्ट टर्म मुदतीची अग्निपथ योजनेतील सैन्यभरती युवकांच्या मुळावर उठली आहे.

त्यामुळे ही योजना रद्द करा, अशी मागणी काँग्रेसने (Congress) केली आहे. तसेच काँग्रेस सत्तेवर आल्यावर अग्निपथ योजना रद्द करून पुन्हा जुन्या पद्धतीने सैन्यभरती सुरू करेल, अशी ग्वाही मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुळात सैन्यभरतीसाठी अग्निपथ योजना सुरू करण्याची गरज नव्हती, असं सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. सैन्याचं आधुनिकीकरण करण्यासाठी खूप संधी आहे, पण याचा अर्थ जुने सर्व मोडीत काढणे असा होत नाही, याकडे पायलट यांनी लक्ष वेधले.

त्यामुळे सत्तेवर आल्यावर पुन्हा पूर्वीप्रमाणे सैन्यभरती केली जाईल, असे सचिन पायलट यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे भारत जोडो न्याय यात्रेतही राहुल गांधी (Rahul Gandhi) तरुणांचं लक्ष याच बाबीकडे वेधत आहेत.

(Edited by Avinash Chandane)

R

Mallikarjun Kharge, Narendra Modi
YS Sharmila Reddy News : शर्मिला रेड्डींसह पतीचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com