अहमद पटेलांचा पुत्र देणार काँग्रेसला धक्का! थेट पक्ष नेतृत्वावरच टाकला बॉम्ब

काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल (Faisal Patel) हे पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
Faisal Patel
Faisal PatelSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : केंद्रात भाजप (BJP) सत्तेच आल्यापासून काँग्रेसमधील अनेक नेते पक्षांतर करत आहेत. त्यातही प्रामुख्याने काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यंग ब्रिगेडला भाजपने खिंडार पाडले आहे. ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, आर. पी. एन. सिंह यांनी काँग्रेसला रामराम केला होता. आता काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल (Faisal Patel) हे पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

अहमद पटेल (Ahmed Patel) हे सोनिया गांधींचे विश्वासू आणि निकटवर्ती सहकारी मानले जात. गांधी परिवाराशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आता त्यांचे पुत्र फैजल पटेल यांनी काँग्रेसला थेट इशारा दिला आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक झाल्यानंतर काही तासांतच त्यांनी पक्षावर बॉम्ब टाकला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, वाट पाहण्याचा मला आता कंटाला आला आहे. पक्षाच्या नेतृत्वाकडून कोणतेही प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे मी आता सगळे पर्याय खुले ठेवले आहेत.

Faisal Patel
राज ठाकरेंची घोषणा अन् लगेचच भाजपच्या अब्जाधीश नेत्याची ऑफर

गुजरातमध्ये यावर्षीच्या शेवटी विधानसभा निवडणूक होत आहे. त्याआधी फैजल पटेल हे काँग्रेसला धक्का देऊ शकतात, अशी चर्चा आहे. अहमद पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्याच्या मुलाने पक्ष सोडल्यास ते काँग्रेससाठी मोठ्या नामुष्कीचे ठरणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीआधी माजी केंद्रीय मंत्री आर.पी.एन.सिंह यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याआधी माजी केंद्रीय मंत्री व यंग ब्रिगेडमधील नेते जितीन प्रसाद यांनी मागील वर्षी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदही मिळालं आहे. दोन वर्षांत काँग्रेसने अनेक बड्या नेत्यांना गमावलं आहे. काँग्रेसची गळती अजूनही सुरू राहण्याची चिन्हे आहेत.

Faisal Patel
पेट्रोल परवडेना म्हणून घोड्यावरून वीजबिल वसुली केली अन् नोकरीवरच गदा!

जोतिरादित्य शिंदे यांनी 2020 मध्ये काँग्रेस सोडली. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार कोसळलं. शिंदे हे राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे नेते होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. आता त्यांच्या यंग ब्रिगेडमध्ये सचिन पायलट हे एक मोठं नाव नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. राजस्थानमधील कॅबिनेटच्या विस्तारावरून ते नाराज होते. पण त्यांची नाराजी दूर झाल्याचे पायलट यांनी काही त्यानंतर सांगितले होते. पण अधूनमधून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पायलट यांच्यातील बेबनावाच्या बातम्या येत असतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com