Ahmedabad plane crash : विमान थोडे आणखी पुढे गेले असते तर कदाचित सगळे वाचले असते.. कारण..
Ahmedabad plane crash : अहमदाबाद येथील विमानतळावरुन लंडनच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे(एआय १७१) हे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांमध्ये कोसळले. तब्बल २४२ प्रवासी घेऊन जाणाऱ्या या विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच हे विमान ज्या इमारतीवर कोसळलं तेथील २४ जणांचा देखील या अपघातात मृत्यू झाला आहे. एकुण २६५ जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याने अवघा देश हळहळला आहे. या अपघातात केवळ एकच प्रवाशी वाचला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मात्र हे विमान का कोसळले, त्यामागचे नेमके कारण काय हा प्रश्न आजून अनुत्तरीत आहे. विमानाच्या अपघाताची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. त्यात पक्षी धडकल्यामुळे झालं असावं हेही एक कारण सांगितलं जात आहे. मात्र या विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण काय हे समजू शकणार आहे.
मात्र वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांनी टेक ऑफ नंतर लगेचच मेडे कॉल करुन आपातकालीन परिस्थितीचा संदेश दिला होता. वैमानिकाने विमान ज्या पद्धतीने खाली आणले ते पाहाता विमान अखेरपर्यंत सुरक्षित ठिकाणी नेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. हा प्रयत्न एक अनुभवी पायलटच करू शकतो, शिवाय हा पक्षी धडकल्याचा प्रकार वाटत नाही असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
कालच्या या भीषण विमान अपघाताच्या घटनेकडे बघून अनेकांना १५ जानेवारी २००९ रोजीच्या यूएस एअरवेजच्या विमानाच्या अपघाताची आठवण झाली. यूएस एअरवेजच्या या ए ३२० विमानाला पक्ष्याने धडक दिली होती. त्यामुळे वैमानिकाने ते हडसन नदीत उतरवले होते. या घटनेत कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झाला नव्हता.
त्यामुळे एअर इंडियाचे कोसळलेले (एआय १७१) हे विमान आणखी थोडे पुढे जाऊ शकले असते तर पुढे साबरमती नदी होती, त्या नदीत विमान उतरवण्याचा प्रयत्न करता आला असता. त्यामुळे प्रवाशांचे जीव कदाचित वाचले असते. "तज्ज्ञांच्या मते, आपत्कालीन स्थितीत जर विमानाचं लँडिंग सुरक्षितपणे झालं, तर ते काही वेळ पाण्यावर तरंगत राहू शकतं."
मात्र, "एअर इंडियाचे हे विमान हवेत झेपावल्यानंतर केवळ १२ ते १५ सेकंदांत नियंत्रणाबाहेर गेले आणि थेट मेघानी भागातील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर आदळले. त्या क्षणी संपूर्ण परिसरात आगीचे भयानक लोट उठले." काही क्षणातच सगळ्यांचा कोळसा झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.