Amit Shah News : शहांच्या मनसुब्यांवर अण्णाद्रमुकने फेरले पाणी; 4 दिवसांतच दिला मोठा धक्का

अण्णाद्रमुकचे प्रमुख के. पलानीस्वामी यांनी मंगळवारी भाजपला धक्का देणारे विधान केले आहे.
Amit Shah, k Palaniswami
Amit Shah, k PalaniswamiSarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वीच तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक आणि भाजपची युती झाल्याची घोषणा केली होती. राज्यात पुढील काही महिन्यांत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपने हा डाव टाकत द्रमुकला सत्तेतून खेचण्यासाठी कंबर कसली आहे. दक्षिण भारतात कर्नाटक वगळता अन्य कोणत्याही राज्यांत भाजपला स्वबळावर सत्ता मिळालेली नाही. ती मिळण्याची सध्यातरी शक्यता नाही. पण आता तमिळनाडूच्या राजकारणातही मोठा ट्विस्ट आला आहे.

अण्णाद्रमुकचे प्रमुख के. पलानीस्वामी यांनी मंगळवारी भाजपला धक्का देणारे विधान केले आहे. भाजप आणि अण्णाद्रमुकच्या युतीचा निवडणुकीत विजय झाल्यास राज्यात कोणतेही आघाडी सरकार नसेल, असे स्पष्ट केले आहे. आमचा पक्ष आघाडी सरकारला स्वीकारणार नाही. भाजपसोबतची आघाडी केवळ निवडणुकीपुरतीच असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Amit Shah, k Palaniswami
Tanisha Bhise death Case : डॉ. घैसासांवर आमदार गोरखेंचा गंभीर आरोप; 20 लाख का मागितले? सांगितले कारण...

पलानीस्वामी यांच्या विधानांमुळे आता अण्णाद्रमुक आणि भाजपमध्ये पुन्हा वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अण्णाद्रमुकमधील काही नेत्यांनाही भाजपसोबत युती नको होती, अशी चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर पलानीस्वामी यांनी केलेले विधान महत्वाचे मानले जात आहे. भाजपला जर सत्तेत घेणारच नसेल, तर निवडणूकपूर्व आघाडीला अर्ज काय, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.

राज्यात 2019 ची विधानसभा आणि 2024 ची लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना अपेक्षित यश मिळाले नाही. वक्फ विधेयकाला तमिळनाडूतही विरोध होत आहे. अण्णाद्रमुकमधील नेत्यांकडूनही विरोध झाला. निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची भीती नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पलानीस्वामी यांना हे विधान करावे लागल्याचे मानले जात आहे.

Amit Shah, k Palaniswami
China-India Relation : ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बनंतर चीनला आठवला भारत; येणं-जाणं केलं सोपं...

भाजप आणि अण्णाद्रमुक दोन वर्षांनंतर एकत्र आले आहेत. ता. 12 एप्रिलला शहांनी पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याची घोषणा केली होती. पलानीस्वामी यांच्याच नेतृत्वाखाली आगामी निवडणूक लढली जाईल, असेही शहांनी जाहीर केले होते. पण आता त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे भाजपला हतबल व्हावे लागणार आहे. त्यामुळे आगामी काळातील अण्णाद्रमुक आणि भाजप युतीबाबत आणखी घडामोडी घडण्याचे संकेत आता मिळू लागले आहेत.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com