AIADMK MLA Suspended : तामिळनाडूत मोठी राजकीय घडामोड! विरोधी पक्षाचे सर्व आमदार निलंबित!

Tamil Nadu Legislative Assembly News : जाणून घ्या काय आहे नेमकं कारण आणि का घेतला गेला एवढा मोठा निर्णय?
AIADMK
AIADMKSarkarnama

Tamil Nadu Politics News : एकीकडे दिल्लीत बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरू असताना, दुसरीकडे तामिळनाडूमध्ये मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. तामिळनाडू विधानसभेत कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल विरोधी पक्षनेते पलानीस्वामी यांच्यासह AIADMKच्या सर्वच आमदारांना उर्वरीत संपूर्ण सत्रासाठी निलंबित केले गेले.

विरोधी पक्षाच्या आमदारांनी एक दिवस आधीच काळे शर्ट घालून कल्लाकुरीची विषारी दारू प्रकरणी आवाज उठला होता आणि यावर चर्चेची मागणी लावून धरली होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी मागणी फेटाळली होती. यानंतर बुधवारी पुन्हा एकदा विरोधी पक्षाचे आमदार या मागणीवरून आक्रमक झाल्याचे दिसून आले.

त्यानंतर अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) पक्षाच्या सर्वच 62 आमदारांना उर्वरीत संपूर्ण सत्रासाठी 29 जूनपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय घेतला गेला. दोन दिवसांमध्ये तामिळनाडूच्या विधानसभेत कल्लाकुरीची विषारी दारू प्रकरणावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला.

AIADMK
Sam Pitroda News : वादग्रस्त सॅम पित्रोदा यांच्यावर काँग्रेसचा पुन्हा 'वरदहस्त'; थेट 'या' पदावर नियुक्ती

एम के स्टॅलिन काय म्हणाले ? -

मुख्यमंत्रई एम के स्टॅलिन(MK Stalin) यांनी या प्रकरावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, कल्लाकुरीची दारू दुर्घटनेवरून चर्चा करण्यासाठी बैठक होईल, परंतु विरोधी पक्षनेते पलानीस्वामींना चर्चा करण्यात रस नाही, त्यांना केवळ सभागृह सोडून बाहेर मीडियासमोर बोलण्यातच रस आहे.

AIADMK
Om Birla : पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्लांनी सदस्यांना खडसावले, 'पुढील पाच वर्ष मला...'

पलानीस्वामी काय म्हणाले? -

विरोधी पक्षनेते पलानीस्वामी म्हणाले, 'आम्ही मागील पाच दिवसांपासून या मुद्य्यावरून चर्चा करण्यासाठी संघर्ष करत आहोत. आधी सांगण्यात आले की नियमानुसार परवानगी दिली जाईल. परंतु जेव्हा आम्ही नियमानुसार काम केले तर त्यांनी परवानगी दिली नाही. सत्ताधारी आणि विरोधकांसाठी वेगळे वेगळे नियम असतात का?'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com