AIADMK : तमिळनाडूत राजकीय भूकंप; पक्ष ताब्यात येताच माजी मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी

ई. पलानीस्वामी यांनी पक्षावर एकहाती ताबा मिळवला आहे.
O. Panneerselvam Latest News, Edappadi K. Palaniswami News, AIADMK News
O. Panneerselvam Latest News, Edappadi K. Palaniswami News, AIADMK NewsSarkarnama
Published on
Updated on

चेन्नई : तमिळनाडूमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अण्णाद्रमुकच्या नेतृत्वारून दोन माजी उपमुख्यमंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या लढाईत ई पलानीस्वामी यांनी बाजी मारली आहे. पक्षाच्या सर्वसाधारण सभेत महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी विरोधी गटातील माजी मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. (AIADMK Latest Marathi News)

दिवंगत जयललिता यांचा अण्णाद्रमुक हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा आहे. तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) ओ. पनीरसेल्वम आणि एडापडी पलानीस्वामी यांच्यामध्ये नेतृत्वासाठी लढाई सुरू होती. अखेर पक्षाच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी पलानीस्वामी यांची महासचिवपदी नियुक्ती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सभा रद्द करावी अशी मागणी पनीरसेल्वम यांनी न्यायालयात केली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळल्यानंतर सभेचा मार्ग मोकळा झाला.

O. Panneerselvam Latest News, Edappadi K. Palaniswami News, AIADMK News
महाराष्ट्रतील सत्तासंघर्ष 'जैसे थे' राहणार; सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना आदेश

महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा ठराव सभेत मांडण्यात आला. हा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला असून पनीरसेल्वम यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे तमिळनाडूतील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

दरम्यान, पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांच्या समर्थकांमध्ये आज जोरदार राडा झाला. सभेच्या ठिकाणी तसेच पक्ष कार्यालयाबाहेर समर्थक एकमेकांना भिडले. जाळपोळ, खुर्च्यांची मोडतोड, पोस्टर फाडणे, हाणामारी अशा घटना घडल्या आहेत. पनीरसेल्वम यांचे समर्थक अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी पक्ष कार्यालयाच्या दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. पनीरसेल्वम यांना आता पक्षाने बाजूला सारल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे समर्थकांकडून पलानीस्वामी यांचा जोरदार विरोध केला जात आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर 2017 पासून या दोन्ही नेत्यांकडे पक्षाचे नेतृत्व आहे. पण आता केवळ एकच नेता पक्षाचे नेतृत्व करू शकतो, या मागणीने जोर धरला होता.. यातून दोन्ही नेत्यांकडून आपणच जयललिता यांचे खरे वारसदार असल्याचा दावा केला जात आहे. पण आता पक्षच्या फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com