Ahmedabad Plane Crash : कोसळलेल्या विमानात होता 'हादरवणारा' पेट्रोल साठा : स्फोटात तयार झालं लोखंडही वितळवणारं तापमान

Ahmedabad plane crash : अहमदाबाद येथील विमान क्रॅश दुर्घटनेने अखंड देश सुन्न झाला आहे. गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळावरुन लंडनच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे (एआय 171) विमान उड्डाणानंतर काही मिनिटांमध्ये क्रॅश झाले.
Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane CrashSarkarnama
Published on
Updated on

Ahmedabad plane crash : अहमदाबाद येथील विमान क्रॅश दुर्घटनेने अखंड देश सुन्न झाला आहे. गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळावरुन लंडनच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे (एआय 171) विमान उड्डाणानंतर काही मिनिटांमध्ये क्रॅश झाले. या विमानात तब्बल 230 प्रवासी आणि 12 क्रु मेंबर असे 242 होते. यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला. तसेच हे विमान बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर क्रॅश झाले. तिथले वरिष्ठ डॉक्टर आणि इंटर्नसह 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात केवळ एकच प्रवासी वाचला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जो एक प्रवासी वाचला तो रमेश विश्वकुमार हा केवळ नशीबवान ठरला आहे. इमर्जन्सी एक्झिटजवळ बसला असल्याने तो सीटसह बाहेर फेकला गेला. अन्य 241 जण आणि 24 डॉक्टर हे सर्व अक्षरशः होरपळून मृत पावले. या विमानात इंधनच एवढे होते की कोणाला बचावाची संधीच मिळाली नाही. हवाई वाहतूकतज्ज्ञांच्या मते अपघाताचे हेही एक प्रमुख कारण असू शकते.

अहमदाबाद ते लंडन प्रवासासाठी सुमारे 9 तासांचा अवधी लागतो. मात्र, आपत्कालीन परिस्थितीचा विचार करुन विमान 12 तास उडू शकेल एवढे इंधन होते. त्यामुळे विमानात पूर्ण क्षमतेने म्हणजे सुमारे एक लाख 26 हजार 907 लिटर अत्यंत शक्तीशाली इंधन होते. पण पूर्ण क्षमतेने भरलेले हे इंधनच या अपघाताचे कारण ठरल्याचे सांगितले जाते. जास्त इंधनामुळे विमानाचे वजन वाढले असावे. तसेच इंधन जास्त असल्याने प्रचंड मोठा स्फोट झाला आणि मृतांची संख्या वाढली.

Ahmedabad Plane Crash
Ahmedabad plane air crash: अहमदाबाद अपघातातील विमानाचे सहवैमानिक होते नाशिकचे बाळासाहेब पाठक, कुटुंबियांना म्हणाले होते, गुड मॉर्निंग!

स्फोटानंतर सुमारे 2 ते अडीच हजार डिग्री सेल्सिअस तापमानाची निर्मिती झाली. या तापमानावर लोखंडही पूर्णत: वितळते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही इंधन जास्त असल्याने तापमान वाढल्याचे सांगितले. ते म्हणाले विमानात जवळपास सव्वा लाख लिटर इंधन होते. त्यामुळे तापमान इतके वाढले की कोणालाही वाचवण्याची संधीच मिळाली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com