
Ahmedabad Air India Accident : अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातातून 242 जणांपैकी केवळ एकच प्रवासी आश्चर्यकारकपणे बचावला आहे. अपघातानंतर झालेला स्फोट, त्यानंतर उठलेले आगाचे लोट अन् धुराचे लोट पाहून धडकी भरली. या अपघातातून विश्वासकुमार रमेश हे एकमेव प्रवासी वाचले आहेत. त्यांचा घटनेच्या वेळचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.
विश्वासकुमार रमेश यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ते एअर इंडियाच्या याच अपघातग्रस्त विमानातून प्रवास करत होते. ते 11A या सीटवर बसले होते. अपघातानंतर ते विमानातून बाहेर फेकले जातात आणि त्यांचा जीव वाचतो. घटनेनंतर त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. ते चालत रुग्णावाहिकेकडे जात असताना या व्हिडीओमध्ये दिसत होते.
आता विश्वासकुमार रमेश यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे विमान वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या परिसरात कोसळले होते. याच इमारतीतून विश्वासकुमार रमेश चालत बाहेर येताना दिसत आहेत. मागे आगीच लोळ आणि धुराचे साम्राज्य पसरले होते. रस्त्यावरील नागरिका सैरावैरा धावत होते. तर रमेश हे हातात मोबाईल घेऊन इमारतीच्या आवारातून बचालत बाहेर येत होते.
रमेश यांना पाहून लोकांना आश्चर्य वाटल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. यापूर्वीच्या व्हिडीओमध्ये रमेश हे रुग्णवाहिकेकडे चालत जाताना स्पष्टपणे दिसत होते. यावेळी लोकांचीही उत्सुकता वाढली होती. रमेश वाचल्यामुळे आणखी काही प्रवासी बचावले असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण विमानातील तब्बल सव्वा लाख लिटर इंधनाच्या स्फोटामुळे त्यांच्याशिवाय एकही प्रवासी बचावला नाही.
दरम्यान, अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 229 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन पायलट आणि दहा क्रू मेंबर्सनीही जीव गमावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातीलही काही प्रवाशांचा समावेश होता. वैद्यकीय महाविद्यालातील काही विद्यार्थ्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.