Air India Plane Crash: चमत्कार...चमत्कार आणि चमत्कारच...! भीषण विमान दुर्घटनेत एक प्रवासी जिवंत सापडला; स्वत: सांगितली अपघाताची 'आपबीती'

Air India flight Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारं वृत्त समोर येताच विमानातील प्रवाशांसाठी देशभरातून प्रार्थना होऊ लागल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत युध्दपातळीवर बचावकार्याला सुरुवात केली आहे.
air plane crash .jpg
air plane crash .jpgSarkarnama
Published on
Updated on

Ahmedabad News : गुजरातमधील अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन 242 प्रवाशांसह उड्डाण घेतलेलं एअर इंडियाचं विमान अवघ्या 7 मिनिटांत खाली कोसळलं.या भीषण विमान दुर्घटनेत आता एक धक्कादायत माहिती समोर येत आहे.एकीकडे 204 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर आता एक प्रवासी जिवंत आढळल्याची माहिती समोर आली आहे.

गुजरातमधील अहमदाबाद लंडनकडे 242 प्रवाशांसह निघालेल्या विमानातील 11 A सीटवरील रमेश विश्वकुमार हे या अपघातात बचावले आहेत.त्यांच्यावर मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

अहमदाबाद विमान दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारं वृत्त समोर येताच विमानातील प्रवाशांसाठी देशभरातून प्रार्थना होऊ लागल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत युध्दपातळीवर बचावकार्याला सुरुवात केली. त्यांच्यासोबत भारतीय लष्कराचे 130 सैनिकही मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले.

गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली. 242 प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान 700 फुटांवरुन मेघानीनगर ह्या नागरी वस्तीत कोसळलं आहे. विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पायलटचा ताबा सुटला अन् अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान (Air India flight Crash ) कोसळलं.

'AP' या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात विमानातील सर्वच्या सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक दिली होती. आता त्यानंतर एक विमान प्रवासी या अपघातातून बचावल्याची माहिती समोर आली आहे.

विमानात 242 प्रवासी होते. त्यापैकी 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. आतापर्यंत अपघातस्थळावरून 100 हून अधिक मृतदेह काढण्यात आले आहेत. अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणार्या विमानाने अहमदाबादहून गुरूवारी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी धावपट्टी 23 वरून टेकऑफ केले होते. धावपट्टी 23 वरून टेक ऑफ केल्यानंतर लगेचच विमान जमिनीवर कोसळले.

टेक ऑफ केल्यानंतर हे विमान तीस सेकंदातच कोसळलं. तसेच आधी ब्लास्ट झाला नंतर विमान कोसळलं, अशी माहिती या अपघातातून बचावलेल्या रमेश विश्वकुमार यांनी मीडियाशी बोलताना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com