Ajit Pawar On NCP Victory: यापुढे अरुणाचल प्रदेशमध्ये विकासाची गंगा वाहणार, विजयी उमेदवारांचं अभिनंदन करताना अजितदादांची गॅरंटी

Ajit Pawar congratulated the winning candidates of NCP: "अरुणाचल प्रदेश येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार निवडून आल्याबद्दल मी तिन्ही उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो."
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

NCP Victory in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँगेसला पक्षाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गटात विभाजन झाल्यानंतर अजित पवारांचा (Ajit Pawar) हा पहिलाच मोठा विजय आहे. अरुणाचलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 15 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर अरुणाचल प्रदेशमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम आज फळास आलं आहे, असं म्हणत अजितदादांनी विजयी उमेदवाराचं अभिनंदन केलं आहे

अरुणाचल प्रदेशमधील (Arunachal Pradesh) विजयानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "अरुणाचल प्रदेश येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार निवडून आल्याबद्दल मी तिन्ही उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. हा विजय ऐतिहासिक असून या निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम आज फळास आले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन करतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष बाब म्हणजे एकूण मतांच्या 10.06 टक्के मतं राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या पदरात पडली, याचा फार आनंद आहे. अरुणाचल प्रदेशच्या मतदार राजानं आमच्या पक्षाच्या उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हीच आमची ताकद असून याच ताकदीच्या जोरावर यापुढे विकासाची गंगा अरुणाचल प्रदेशमध्ये वाहेल असा शब्द देतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासाची पावलं पुढे पडत आहेत आणि अरुणाचल प्रदेशमधील यश हे पक्षाच्या प्रगतीचे द्योतक आहे. लोकशाहीची मुल्ये अंगीकारून आमचा पक्ष देशभर विकासाचे नवनवे आदर्श उभे करेल यात काही शंका नाही. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत." अशा शब्दात अजित पवारांनी अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं.

Ajit Pawar
Bhiwandi Lok Sabha Constituency : कपिल पाटील जिंकण्याचा अंदाज; मग का भांडताहेत भाजप नेते?

अरुणाचल प्रदेशातील 60 जागांचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने 46 जागांवर विजय मिळवला. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढण्यात आली होती. त्यामुळे आता लोकसभेच्या निकालापूर्वीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना गुलाल उधळण्याची संधी मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com