Bhiwandi Lok Sabha Constituency : कपिल पाटील जिंकण्याचा अंदाज; मग का भांडताहेत भाजप नेते?

Jagannath Patil vs Kisan Kathore : मुरबाडमधील भाजपचे आमदार किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची माजीमंत्री जगन्नाथ पाटलांची मागणी
Kapil Patil
Kapil Patil Sarkarnama

Bhiwandi BJP Politics : भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार कपिल पाटील व भाजप आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये अनेकदा खटके उडाले होते . लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी या दोघांमध्ये समजुत काढण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यात अलबेल असल्याचे दाखवले जात असले, तरी निवडणुकीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी किसान कथोरे यांनी समर्थकांमार्फत प्रयत्न केल्याचा आरोप करत आमदार किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पत्रात जगन्नाथ पाटील यांनी मुरबाड विधानसभेतील आगरी भागात तुतारी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार(Sharad Pawar) उमेदवार बाळ्या मामा यांना मतदान करायला सांगितलं , कुणबी भागात शिलाई मशीन म्हणजे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना मतदान करायला कार्यकर्त्यांना सूचना केली, असे म्हणत या संदर्भात माझ्याकडे सर्व पुरावा असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी केला आहे. तसेच, आमदार किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.

Kapil Patil
Bhiwandi Lok Sabha Exit Poll : दिल्लीला निघालेल्या 'बाळ्यामामा'ची धाव भिवंडीतच!

दरम्यान, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि आता शरद पवारांची राष्ट्रवादी असा पक्ष बदलांचा प्रवास करणाऱ्या सुरेश उर्फ बाळ्यामामा यांना यंदाही भिवंडी लोकसभा निवडणुकीत टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार पराभवास सामोरे जावे लागू शकते, तर भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील(Kapil Patil) पुन्हा कमळ फुलवण्यात यशस्वी होणार असल्याचे दिसत आहे.

Kapil Patil
Loksabha Election Exit Poll : उत्तर- मध्य मुंबईत भाजपला उमेदवार बदलण्याचा फटका!, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर

2024ला फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार चारसौ पार. यामुळे राहुल गांधींचा दौरा येवो नाही तर अजून काही येवो, भिवंडी लोकसभेच्या निकालात काही फरक पडत नाही,' असा ठाम विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला होता.


(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com