BJP News : भाजपच्या लाटेत सपाच्या अडीच हजार उमेदवारांची अनामत रक्कम जप्त ; काँग्रेस, बसपा, आपच्या..

Uttar Pradesh Politics : बसपाने ३ हजार ७८५ उमेदवार रिंगणात उतवले होते.
yogi adityanath , narendra modi
yogi adityanath , narendra modi Sarkarnama

Uttar Pradesh Politics : उत्तरप्रदेशातील नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. यात भारतीय जनता पक्षाचे बहुमत मिळवले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय पुन्हा आला. त्यामुळे विरोधी पक्षाना त्यांचा मोठा फटका बसला.

उत्तरप्रदेशात भाजपच्या लाटेत समाजवादी पार्टी,बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेसच्या अनेक उमेदवारांनी आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही. भाजपने एकूण १० हजार ८१४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतविण्यात आले आहे.

yogi adityanath , narendra modi
Vikas Thakre : कॉंग्रेसच्या आमदारांकडून मेट्रोमॅन दीक्षितांच्या चौकशीची मागणी !

यात ३ हजार ८७३ उमेदवारांचा विजय झाला आहे म्हणजे ३४.२७ टक्के उमेदवार विजयी झाले आहेत. समाजवादी पक्षाच्या निम्म्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. यात २ हजार ५४४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.

समाजवादी पक्षाने या निवडणुकीत ५ हजार २३२ उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर दुसरीकडे बसपाच्या १ हजार २१५ उमेदवार विजयी झाले आहेत. यातील २ हजार ५४४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. बसपाने ३ हजार ७८५ उमेदवार रिंगणात उतवले होते.

yogi adityanath , narendra modi
Mahesh Landge News : पुणे जिल्ह्याच्या विभाजनामागे आमदार लांडगेंचे शिरूर लोकसभेचे गणित?

काँग्रेसने एकूण २ हजार ९९४ उमेदवारांनी निवडणूक लढवली. यात फक्त २६३ जणांचा विजय झाला. २ हजार ३४५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाच्या २ हजार १५५ जणांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com