Delhi Election Result update : दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची अपेक्षित कामगिरी नाही; आठवलेंचीही तीच गत...

Ajit Pawar NCP Ramdas Athawle RPI Candidates Election Result : अजित पवार आणि रामदास आठवले यांनीही दिल्लीत आपल्या पक्षाचे उमेदवार उतरवले होते.  
Ajit Pawar, Ramdas Athawale
Ajit Pawar, Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

New Delhi Latest News : केंद्रात एनडीए सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाने (आठवले) दिल्लीच्या निवडणुकीत भाजपविरोधात उमेदवार उतरवले. आतापर्यंत निकाल लागलेल्या मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अनेक उमेदवारांना तर मतांची शंभरीही गाठता आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांच्या पक्षाची देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ही पहिलीच निवडणूक होती. महाराष्ट्रात सत्ता मिळाल्यानंतर देशभरात पक्षाचा विस्तार करण्याची भूमिका त्यांनी काही महिन्यांपूर्वीच मांडली होती. पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी आणि देशभरातील मतांचा टक्का वाढवण्यासाठी दिल्लीत उमेदवार उतरवण्यात आले होते. उमेदवारांना अधिकाधिक मते मिळावीत, यासाठी पक्षाने जोरही लावला होता.

Ajit Pawar, Ramdas Athawale
Arvind Kejriwal Defeat : दिल्लीत केजरी'वॉल' उद्ध्वस्त; बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का, आतिशींची आतषबाजी...

दिल्लीत एखादा अपवाद वगळता अजितदादांच्या एकाही उमेदवाराला एक हजार मतांचा टप्पाही ओलांडला आला नाही. काही उमेदवार तर 50 मतेही मिळवू शकले नाहीत. त्यामुळे सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, मोतीनगरमधील पक्षाचे उमेदवार सनाउल्लाह यांना केवळ 60 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात नोटाला मिळालेली मते 689 एवढी आहेत. राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी 0.03 एवढी कमी राहिली आहे.

छत्तरपूर मतदारसंघातील उमेदवार नरेंद्र यांना 173 मिळाली आहेत. तर विजयी उमेदवाराला तब्बल 80 हजार 469 मते मिळाली आहेत. तसेच संगम विहामध्ये कमर अली यांना 78, लक्ष्मीनगरमधील उमेदवाराला 48 मते, चांदणी चौकमध्ये 81, मलिमरनमध्ये 38 मते मिळाली आहे. या सर्व मतदारसंघातही नोटाला मिळालेली मते अधिक आहेत.  

Ajit Pawar, Ramdas Athawale
Delhi Assembly Election Update : दिल्लीत काँग्रेस भाजपच्या विजयासाठी लढली; अखेर मनातलं बाहेर आलं...

केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी काही मतदारसंघ उमेदवार उतरवले होते. त्यांचीही राष्ट्रवादीप्रमाणेच गत झाली. राजिंदरनगर मतदारसंघात भाजपला विजय मिळाला असून तिथे रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचा उमेदवारही रिंगणात होता. या उमेदवाराला केवळ 65 मतांवर समाधान मानावे लागले. नोटाला जवळपास 600 मते आहेत.

सुलतानपूर माजरामधील उमेदवार लक्ष्मी यांना 70 मते, सीलमपूरमध्ये मोहम्मद नझीर यांना 107 तर कोंडलीमधील उमेदवार आशा कांबळे यांना 188 मते मिळाली आहेत. आठवलेंच्या पक्षाच्याही सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com