
BJP won Delhi update : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहे. अंतिम निकाला आता येऊ लागले असून अनेक धक्कादायक निकालांची नोंद होत आहे. आम आदमी पक्षाचे संस्थापक व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. त्याचप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री व पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मनिष सिसोदियाही पराभूत झाले आहेत.
अरविंद केजरीवाल यांचा पराभव आपसाठी पक्षाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का आहे. भाजपचे नेते प्रवेश वर्मा यांनी 3 हजारांहून अधिक मतांनी त्यांचा पराभव करत जायंट किलर ठरले आहेत. नवी दिल्ली मतदारसंघ केजरीवालांचा बालेकिल्ला होता. पहिल्या फेरापासूनच दोन्ही उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर सुरू होती.
सिसोदिया यांचा पराभवही आपसाठी जिव्हारी लागणारा ठरला आहे. जंगपुरा मतदारसंघातून केवळ 600 मतांनी ते पराभूत झाले आहेत. तरविंदरसिंह मारवाह यांनी त्यांचा पराभव केला पराभवानंतर बोलताना ते म्हणाले, पक्षाचे कार्यकर्ते चांगले लढले. लोकांनी आम्हाला चांगला पाठिंबा दिला. मी जिंकलेल्या उमेदवाराचे अभिनंदन करतो. मतदारसंघासाठी ते चांगले काम करतील, अशी अपेक्षाही सिसोदिया यांनी व्यक्त केली.
केजरीवाल, सिसोदिया यांच्यासह दुर्गेश पाठक, सोमनाथ भारती, सौरभ भारद्वाज, सत्येंद्र जैन हे बडे नेतेही पराभवाच्या छायेत आहेत. आपच्या बड्या नेत्यांचा पराभव करत भाजपने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. आपच्या इतिहासातील हा पहिला सर्वात मोठा लाजीरवाणा पराभव ठरला आहे.
एकीकडे बडे नेते धारातीर्थी पडत असताना विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांचा विजय झाला आहे. त्यामुळे पक्षाला काहीसा दिलासा मिळाला आहे. कालकाजी मतदारसंघातून त्यांनी भाजपचे उमेदवार रमेश बिथूडी यांचा पराभव केला आहे. आतिशी 2700 मतांनी विजयी झाली आहेत. विशेष म्हणजे त्या सुरूवातीपासून पिछाडीवर होत्या. अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये त्यांनी पिछाडी भरून काढत विजय मिळवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.