Ajit Pawar on NDA Alliances : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीच्या सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. बहुमताच्या आकड्याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, केंद्रात स्पष्ट बहुमत आहे. जोपर्यंत केंद्रात चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार, चिराग पासवान आणि एकनाथ शिंदे सोबत आहेत, पाच वर्ष तर सरकार आरामात चालेल. काहीच अडचण नाही. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
याशिवाय विरोधकांचा आरोप आहे की, हा चोरलेला जनादेश आहे. यावर उत्तर देताना अजित पवारांनी(Ajit Pawar) सांगितलं, ते तर असंच बोलणार. विरोधक असं का म्हणतील की सरकार व्यवस्थित सुरू आहे. तसेच अजित पवारांनी म्हटले की, 2019मध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रित निवडणूक लढले होते आणि जिंकलेही होते. नंतर त्यांच्या मतभेद झाले आणि मग उद्धव ठाकरे व काँग्रेस सोबत आले. कुणी विचारही केला नव्हता की उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सोबत येऊन महाराष्ट्रात सरकार बनवतील.
तुमच्या मते खरी शिवसेना कुणाची? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, 'यावर मी काय सांगू शकतो. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) म्हणतात की बाळासाहेब ठाकरे आज जिंवत असते तर ते कधीच काँग्रेस सोबत गेले नसते. मुख्यमंत्री शिंदेंचे म्हणणे आहे की ते बाळासाहेबांच्या विचारांबरोबर आहेत. काँग्रेससोबत आघाडी व्हायला नको होती. बाळासाहेबांची विचारधारा नेहमीच काँग्रेसच्या विरोधात होती. तेव्हाचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे.'
याशिवाय अजित पवारांनी सांगितलं की, येणाऱ्या काळात आम्ही महाराष्ट्रासाठी विकासाची आणखी कामं करू इच्छित आहोत. आम्ही ज्या योजना आणल्या आहेत, त्या निवडणुकीतील केवळ घोषणा नाहीत. आम्ही समतोल साधून पुढे जाऊ इच्छित होतो. मोठ-मोठ्या प्रकल्पासांठी जास्तीत जास्त निधी केंद्राकडून आणू इच्छित आहोत. जसं आंध्र प्रदेशासाठी चंद्राबाबू नायडू आणि बिहारसाठी नितीशकुमार घेऊन आलेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.