Ajmer Sharif Dargah: हिंदू सेनेच्या विरोधानंतरही अजमेर दर्ग्याला नरेंद्र मोदी पाठवणार चादर; काय आहे प्रकरण

PM Modi To Send Chadar To Ajmer Sharif Dargah : आज (गुरुवारी) भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे ते औपचारिक चादर सुपूर्द करणार आहेत.
PM Modi
PM Modi Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: ख्वाजा मोइद्दीन चिश्ती अजमेर हा दर्गा नसून हे एक शिव मंदीर असल्याचा दावा हिंदू सेनेने केला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी अजमेर शरीफ दर्ग्याला आज सांयकाळी चादर पाठवणार आहेत. या सोहळ्यासाठी मोदी दरवर्षी दर्ग्याला चादर पाठवतात.दर्ग्याला ८५० वर्षाचा इतिहास आहे.

हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा ८१३ वा उरुस २८ डिसेंबर २०२४ रोजी सुरू झाला आहे.ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्याला (मझार-ए-अख्दास) चादर अर्पण करणे भक्ती आणि आदराचे प्रतीक आहे. उरुस दरम्यान चादर अर्पण करण्याची ही प्रथा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे.

यानिमित्ताने मोदी अजमेर शरीफ दर्ग्याला चादर पाठवणार असून आज (गुरुवारी) सांयकाळी 6 वाजता भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी आणि केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे ते औपचारिक चादर सुपूर्द करणार आहेत.

PM Modi
Maharashtra Politics Live News: कुर्ला येथील बेस्ट बस अपघात प्रकरण; बसचालक संजय मोरेच्या जामीन अर्जाला पोलिसांचा विरोध

किरण रिजीजू,जमाल सिद्धीकी हे मोदी यांच्याकडून चादर घेऊन अजमेरला जाणार आहेत. 4 जानेवारीला अजमेरच्या दर्ग्यावर ही चादर चढवली जाणार आहे. आत्तापर्यंत मोदी यांनी १० वेळा चादर पाठवली असून यंदाच हे ११ वे वर्ष आहे.

PM Modi
Jalgaon News: गुलाबराव पाटलांच्या पत्नीला शिवीगाळ? चालकाने हॉर्न वाजवल्याने राडा? नेमकं काय झालं

हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी याला विरोध केला आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चादर पाठवणं योग्य नाही असे त्यांनी मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्यानं जर मोदींकडून चादर पाठवली तर दबाव निर्माण होईल आणि याचिकेवर परिणाम होईल, असा पत्रात उल्लेख केला आहे. या प्रकरणी अजमेर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

या नेत्यांनी दिली आहे दर्ग्याला भेट

परवेझ मुशर्रफ

जनरल झिया-उल-हक

बेनझीर भुट्टो

शेख हसीना

बराक ओबामा

यांच्यासह देश-परदेशातील अनेक राजकीय नेत्यांनी देखील दर्ग्याला भेट दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com