BN Chandrappa appointed as working president karnataka congress : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं राजकारण तापलं असून काँग्रेसमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कर्नाटक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी बीएन चंद्रप्पा यांची निवड करण्यात आली आहे.
कर्नाटक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष आर ध्रुवनारायण यांचे गेल्या महिन्यात निधन झाले होते. आता त्यांच्या जागी बीएन चंद्रप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आहेत. त्यांच्याशिवाय पाच कार्यकारी अध्यक्ष आहेत. बीएन चंद्रप्पा यांच्याशिवाय रामलिंगा रेड्डी, सलीम अहमद, ईश्वर खांद्रे, सतीश जारकीहल्ली यांचा यात समावेश आहे.
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी "राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकाअर्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काम करणे मला आवडेल," असे शनिवारी सांगितले आहे. "मल्लिकाअर्जुन खर्गे यांना मुख्यमंत्रीपद दिले तर आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेणार," असे शिवकुमार यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींचा कर्नाटक दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
काँग्रेसचे नेते, कर्नाटक विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सिद्धारमैया हे मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. आपल्या समर्थकांना तिकीट मिळण्यासाठी सिद्धारमैया यांनी कंबर कसली आहे. शिवकुमार आणि सिद्धारमैया यांच्यातील मतभेद जगजाहीर आहे.
दहा मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. एकूण २२४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा निकाल १३ मे रोजी जाहीर होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०४ जागा मिळाल्या होत्या. भाजपने सत्ता स्थापन केली होती, तर काँग्रेस ८०, जेडीएसने ३७ जागा जिंकल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.