NDA Alliance News : कृषी कायद्यांवरून भाजपशी फारकत घेतलेला 'अकाली दल' पुन्हा 'एनडीए'त; जागावाटपाचा तिढा मात्र...

Akal Dal In NDA : 'भाजपला हव्यात पाच जागा, अकाली दल मात्र सोडणार दोन...'
NDA Alliance News :
NDA Alliance News : Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यामध्ये इंडिया व एनडीए आघाडीकडून नवे पक्ष जोडण्यावर भर दिला जात आहे. कर्नाटकातील जनता दल सेक्युलर एनडीए आघाडीत सहभागी झाल्यानंतर आता अकाली दलाने भाजपसोबत बोलणी सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

अकाली दल पुन्हा लवकरच 'एनडीए'मध्ये सहभागी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. पंजाबमध्ये अकाली दल भाजपला लोकसभेचे दोन ते तीन जागा सोडणार आहे, तर भाजप पंजाबच्या तेरापैकी पाच जागेवर निवडणूक लढवू इच्छित आहेत. त्यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे.

NDA Alliance News :
Supiya Sule On NCP : राष्ट्रवादी कुणाची? सुप्रिया सुळेंनी दोनच शब्दांत विषय संपवला; म्हणाल्या...

अकाली दलाच्या माध्यमातून भाजपला चाळीसावा मित्रपक्ष मिळणार आहे. कॅनडासोबतच्या भारताची संबंध ताणले गेल्यानंतर गुरुवारी अकाली दलाचे नेते सुखदेवसिंह बादल व हरमीत कोर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. नवीन संसदेतील त्यांच्या कक्षात भेट घेतल्यानंतर पंजाबमध्ये अकाली दल व भाजप मिळून एकत्र निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे.

NDA Alliance News :
NDA Front Lok Sabha : लोकसभेपूर्वी 'एनडीए'चा परिवार वाढणार? अकाली-टिडीपीची घरवापसी तर जेडीएस...

पंजाबमध्ये अकाली दल भाजपला लोकसभेचे दोन ते तीन जागा देत आहे, तर भाजप पंजाबच्या तेरापैकी पाच जागांवर निवडणूक लढू इच्छित आहेत. जागावाटपाबाबत सुखदेवसिंग बादल यांच्याबरोबर भाजप पंजाबचे अध्यक्ष सुनील जाखंड चर्चा करत आहेत. या दोघांतील चर्चा पूर्ण झाल्यानंतर लवकरच अकाली दल व भाजप युती झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर अकाली दलाने एनडीएची साथ काही दिवसांपूर्वी सोडली होती. आता शेतकरी आंदोलन संपले आहे. त्यामुळे तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घेतले आहेत. त्यामुळे अकाली दल येत्या काळात एनडीएसोबत जाणार आहे.

यापूर्वीच कर्नाटकमधील सेक्युलर पक्षाने इंडियामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी भाजपबरोबर मिळून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. कर्नाटकातील ३९ जागांपैकी पाच जागा जेडीएसला देण्याचे ठरले आहे. त्यापैकी चार जागा निश्चित झाल्या आहेत, एक जागेबाबत त्यांच्यात सुरू आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com