
Akash Kanojia arrested by police News: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्लाप्रकरणी सर्वात आधी छत्तीसगडच्या दुर्ग येथून ज्या आकाश कन्नौजियाला संशयित समजून पोलिसांकडून अटक झाली होती. त्या आकाशचे आयुष्य अक्षरशा उध्वस्त झाले आहे. त्याने आपले दु:ख सांगितले आहे.
आकाश म्हणाला की, सैफ अलीखान(Saif Ali Khan) वरील हल्ल्याच्या घटनेमुळे माझे आयुष्य उध्वस्त झाले आहे. नोकरी गेली, ठरणारे लग्नही मोडले आणि माझ्या कुटुंबालाही त्रास सहन करावा लागत आहे. सैफवरील हल्ल्याच्या घटनेनंतर सर्वात आधी आरपीएफने आकाश कनौजिया यास संशिय आरोपी म्हणून अटक केली होती.
मात्र यानंतर आकाशला सोडण्यात आले. कारण, मुंबईतून शरीफुल यास या प्रकरणात अटक झाली आणि त्याने गुन्हा देखील कबूल केला. परंतु आकाशला मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणात नाव समोर आल्याने त्याची नोकरी गेली, एवढंच नाहीतर ठरणारं लग्नही मोडलं. त्याच्या कुटुंबाला त्रास होतोय ते वेगळच.
या सर्व प्रकरणामुळे आयुष्य उध्वस्त झालेल्या आकाशने अखेर आपलं दु:ख मांडलं. खरंतर जेव्हा त्याला अटक झाली तेव्हा आकाश त्याच्या होणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी जात होता. आकाश म्हणाला, जेव्हा मीडियाने माझे फोटो दाखवणे सुरू केले, तेव्हा माझं कुटुंब हादरलं! दावा केला की मीच सैफ अली खानवर हल्ला केला आहे. मुंबई पोलिसांच्या(Mumbai Police) चुकीमुळे माझं आयुष्य उध्वस्त झालं. पोलिस गडबडीत हे देखील बघणं विसरली की जो व्यक्ती सैफच्या घरामधील सीसीटीव्हीत दिसत आहे, त्याला मिशी नव्हती आणि मला मिशी आहे.
आकाशची कन्नौजियाच्या आजीने मोठा आरोप केला की, मुंबई पोलिसांच्या सूचनेनंतर RPF पोलिसांनी दुर्ग येथून आकाशला ताब्यात घेतलं होतं. मीडियाशी बोलताना आकाशच्या आजीने आपलं दु:ख व्यक्त केलं. मुंबई पोलिसांच्या सूचनेनंतर माझ्या नातावाला अटक केली गेली आणि त्यानंतर त्याची नोकरी गेली व ठरणारे लग्नही मोडले. आकाश मुलगी बघण्यासाठी आजीच्या घरी जात असतानाच त्याला पोलिसांनी पकडलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.