
Pune News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा बाबा सिद्दीकी यांची तीन महिन्यांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग होता. तर सलमान खान याच्या जवळचे सिद्दीकी असल्याने त्यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात येत होता. यादरम्यान आता अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षतेत मोठी वाढ करण्यात येत असतानाच अभिनेता सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्लामागे देखील लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असण्याची शंका आता निर्माण होत आहे. तर याप्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
बुधवारी रात्री (ता.15) मुंबईतील वांद्रे येथील घरी सैफ अली खानवर हल्ला झाला. यात हल्ल्यात त्याच्यावर सहा वार करण्यात आले असून सध्या लिलावतीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर पोलिस तपासात करत आहेत. अशातच आता सत्ताधारी महायुतीवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी जोरदार निशाना साधत महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे म्हटले आहे.
यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, जेष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यावरून राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना टीका केली आहे.
कदम यांनी, आता विरोधक सैफ अली खानवरील हल्ल्यामुळे सरकारवर हल्ला करत आहेत. ते याचा राजकीय मुद्दा बनवू इच्छितात. पण फक्त त्याचे आडनाव खान असल्याने हे केलं जातयं असा दावा कदम यांनी केला आहे.
सैफ अली खानवर झालेला हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला असावा, असे प्राथमिक तपासात उघड होत आहे. सध्या पोलिसांना याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज सापडले असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत. चोराचा चेहरा देखील स्पष्ट झाला असून आम्ही माहिती गोळा करत आहोत. तपास सुरू असून चोरीचा प्रयत्न होता की हत्येचा? हे आत्ताच सांगू शकत नाही. तर तो व्यक्त मागच्या भिंतीवरून घरात घुसल्याचेही कदम यांनी म्हटले आहे.
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावरून विरोधक सरकारवर तुटून पडले आहेत. यावरून कदम यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी, विरोधी पक्ष गांभीर्य दाखवत नाहीये. मी सर्वांना खात्री देतो की मुंबई सुरक्षित आहे. तपास अजूनही सुरू आहे. तपास पूर्ण होऊ द्या.
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. सर्वांचे लक्ष फक्त बैठका, परिषदा, उत्सव, पंतप्रधानांचे स्वागत आणि शिबिरांवर केंद्रित आहे. पण राज्य कोणत्या दिशेने जात आहे. तिकडे कोणाचे लक्ष नसल्याची टीका त्यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.