

Akhilesh Yadav On BJP Modi Government : केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारला अंहकारी म्हणत, समाजवादी पक्षाच्या युवा खासदारांना विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा आदेश समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दिला.
याशिवाय भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला डिवचताना, हे भाजप सरकार नोकरी चोरीबरोबर, मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील चंदा चोरी करणारे म्हणत, देणगी चोरीचा पैसा हा कर्नाटक आणि महाराष्ट्रात कसा पोहोचला आणि कशासाठी पोहोचला, असा प्रश्न करत अखिलेश यादव यांनी खळबळ उडवून दिली.
गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीने (CJP) नीट पेपरफुटीप्रकरणी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलनाला आज मोर्चाचे स्वरूप आले आणि संसदेच्या दिशेने निघाले. या मोर्चाने पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने दिल्लीत मोठा गदारोळ झाला.
दिल्ली पोलिसांनी विद्यार्थी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याबरोबर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याने आंदोलन चिघळले. यावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी, संसद परिसरातून केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
अखिलेश यादव म्हणाले, "केंद्रातील भाजपचे मोदी सरकार हे अहंकारी सरकार आहे. आत्महत्या झालेल्या विद्यार्थ्यांविषयी श्रद्धांजलीवर एक शब्द देखील उच्चारलेला नाही. या आंदोलनाबरोबर देशांमधले करोडो कुटुंब जोडले गेलेले आहेत. एवढे असताना, हे अहंकारी सरकार संसदेपर्यंत आलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांचे तक्रारी ऐकायला तयार नाही. यातून सरकारमधील अहंकार दिसतो."
विद्यार्थ्यांचे ऐकायला तयार नसलेल्या सरकारने त्यांच्या आंदोलनामध्ये अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. लाठीचार्ज केला जात आहे. आणखी काही अडथळे निर्माण करता येतील का? ते देखील हे सरकार पाहत आहे. भाजप सरकारचा इतिहास पाहिला तर भयंकर आहे. उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या भाजप सरकारने, मेडिकल कोटा झिरो केला होता. भाजप सरकार नेहमीच घोटाळे करत आलेले आहे, असा घणाघात अखिलेश यादव यांनी केला.
नीट पेपर घोटाळ्यामध्ये भाजपचा मोठा सहभाग आहे. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही ऑडिट केलेले आहे. आत्तापर्यंतच्या पेपर लिकमध्ये भाजप सरकारचा स्पष्ट सहभाग दिसतो आहे. वीस पेक्षा जास्त पेपर उत्तर प्रदेशमध्ये फुटलेले आहेत. परंतु त्यामध्ये एकही दोष आढळलेला नाही. कारण की त्यात भाजपचे लोक सहभागी आहेत. सरकारी नोकरी द्यायची म्हटल्यावर तिथे आरक्षण आले. त्यांना आरक्षण द्यायचे नाही आणि आरक्षणामुळे घोटाळा करता येत नाही, असाही दावा अखिलेश यादव यांनी करत भाजपला घेरले.
भरती प्रक्रिया तिसऱ्या यंत्रणेमार्फत राबवल्यास तिथे भ्रष्टाचार करणे सोपे होते आणि हे भाजपवाल्यांना चांगले माहित आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे, याचे अतोनात दुःख होत असून, माझ्या पक्षाच्या युवा खासदारांनी आंदोलनात सहभागी होऊन, आंदोलकांचे म्हणणे ऐकावे, अशा सूचना केल्याचे अखिलेश यादव यांनी सांगितले.
भाजप सरकार नोकरीच चोरत नाही, तर हा पक्ष चंदा चढावा चोरी देखील करतो. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या मंदिरात चोरी झालेली आहे. श्रीराम मंदिरामध्ये चोरलेला पैसा हा कर्नाटक आणि महाराष्ट्रापर्यंत गेलेला आहे, आणि हा पैसा कशासाठी पाठवलेला आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तपासात दिल्लीऐवजी लखनऊची एसआयटी नेमली आहे. या तपासात काय निष्पन्न होणार आहे हे सर्वश्रुत आहे, असा संशयास्पद दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.