Amit Shah News : अध्यक्षपदावरून लोकसभेत भाजपला डिवचले; अमित शहांचं विरोधकांना जिव्हारी लागणारं उत्तर...

Akhilesh Yadav BJP Taunt Amit Shah Reply to Opposition : वक्त सुधारित विधेयकावर चर्चा सुरू असताना अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला.
Amit Shah in Lok Sabha
Amit Shah in Lok SabhaSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Session : लोकसभेत वक्फ सुधारित विधेयकावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान भाजपच्या अध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या मुद्द्यावर भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. पण हे त्यांच्याच अंगलट आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगेचच यादव यांच्यास सर्वच विरोधकांना जिव्हारी लागणारे उत्तर दिले.

वक्फ सुधारित विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. अखिलेश यादव समाजवादी पक्षाची भूमिका स्पष्ट करत असताना सत्ताधारी बाकांवर अमित शाहही उपस्थित होते. भाजपच्या विधेयकाबाबतच्या भूमिकेवर टीका करताना यादव यांनी अध्यक्षपदाचा मुद्दा काढला. सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला अजून अध्यक्ष निवडता आलेला नाही, असे ते म्हणाले.

Amit Shah in Lok Sabha
BJP New National President : भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? पीएम मोदी, शहांसोबतच 'या' तिसऱ्या बड्या नेत्याची भूमिका असणार महत्त्वाची

अखिलेश यांच्या या विधानाला अमित शहांनी हसत-हसत खोचक उत्तर दिले. ते म्हणाले, आम्हाला लाखो लोकांमधून अध्यक्ष निवडावे लागतात. आमच्यासमोर जे पक्ष आहेत, हे लोक तर कुटुंबातील पाच सदस्यांतूनच अध्यक्ष निवडतात. अखिलेश यादव पुढील २५ वर्षे अध्यक्ष राहतील, असे जिव्हारी लागणारे उत्तर शहांनी दिले.

दरम्यान, भाजपला चिंता असलेल्या टीडीपी आणि जेडीयू या दोन्ही पक्षांनी विधेयकाला पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या नेत्यांनी लोकसभेतही आपली भूमिका मांडताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यात आपल्या सरकारने मुस्लिमांसाठी केलेली कामे सांगत विधेयक का आवश्यक आहे, याची यादीच वाचून दाखवली.

Amit Shah in Lok Sabha
Waqf Bill News : धक्कादायक! संसदेच्या जागेवरही होता ‘वक्फ’चा दावा; लोकसभेत मंत्र्यांनीच दिली माहिती...

विरोधकांकडून या विधेयकाला कडाडून विरोध केला जात आहे. काँग्रेसकडून खासदार गौरव गोगोई यांनी सुधारित विधेयकातील त्रुटींवर बोट ठेवले. आधीच्या कायद्यातील तरतुदींनाच मुलामा दिल्याचा आरोप त्यांनी केला. तर अखिलेश यादव यांनीही भाजपला धारेवर धरले. एक्स काँग्रेस नेतेच भाजपमधून अधिक बोलत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com