Waqf Bill News : धक्कादायक! संसदेच्या जागेवरही होता ‘वक्फ’चा दावा; लोकसभेत मंत्र्यांनीच दिली माहिती...

Waqf Board Land Ownership Controversy Parliament session : वक्फ सुधारित विधेयक लोकसभेत सादर करण्यापूर्वीच त्यावर काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेतला.
Parliament
ParliamentSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : बहुचर्चित वक्फ सुधारित विधेयक बुधवारी लोकसभेत सादर करण्यात आले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक सादर करताना अनेक गंभीर मुद्दे सभागृहात मांडले. यावेळी त्यांनी तत्कालीन यूपीए सरकारवर गंभीर आरोप करताना आम्ही हे विधेयक आणले नसते तर वक्त बोर्डाने संसदेवरही दावा सांगितला असता, असे विधान रिजिजू यांनी केले.

वक्फ सुधारित विधेयक लोकसभेत सादर करण्यापूर्वीच त्यावर काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेतला. के. सी. वेणुगोपाल यांच्यासह काही सदस्यांनी संयुक्त संसदीय समितीच्या शिफारशींसह सुधारित विधेयक सादर करता येत नाही, असा मुद्दा त्यांनी मांडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा मुद्दा खोडून काढत मंत्रिमंडळाने शिफारशींवर विचार करून सुधारित विधेयकाला मंजूरी दिल्याचे स्पष्ट केले.

Parliament
Waqf Amendment Bill Live : केंद्रीय मंत्र्यांच्या विधानाने विरोधी गोटात खळबळ; काँग्रेसच्या अनेक खासदारांचा ‘वक्फ’ला पाठिंबा?

शाह यांच्या स्पष्टीकरणानंतर रिजिजू यांनी विधेयक सादर केले. यावेळी बोलताना त्यांनी यूपीएच्या काळातही वक्फ कायद्यात सुधारणा झाल्याचे सांगितले. तसेच यूपीएच्या काळात दिल्लीतील 123 जागा वक्फ बोर्डाला दिल्याचा आरोपही त्यांनी केला. या जागांमध्ये काही सरकारी जागांचाही समावेश होता. संसदेच्या जागेवरही वक्फचा दावा होता, अशी धक्कादायक माहितीही रिजिजू यांनी यावेळी दिली.

रिजिजू यांच्या या विधानानंतर काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला. रिजिजू यांनी ही अधिकृत माहिती असल्याचे स्पष्ट केले. या विधेयकामुळे कोणत्याही धार्मिक स्थळांच्या किंवा मशिदींच्या व्यवस्थापनात ढवळाढवळ केली जाणार नाही. केवळ वक्फ बोर्डाचे व्यवस्थापन आणि संपत्तीच्या व्यवस्थापनाबाबत हे विधेयक असल्याचे त्यांनी सांगितले.

Parliament
Waqf Bill update : वक्फ विधेयकावरून नितीश कुमारांच्या पक्षात फूट; विश्वासू नेत्याने दिला इशारा...

जगात सर्वाधिक वक्फ संपत्ती भारतात आहे. त्यानंतर गरीब मुस्लिमांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या विकासासाठी काम का झाले नाही, असा प्रश्न रिजिजू यांनी केला. मोदी सरकार हे काम करत आहे, त्याला विरोध का होताय. आम्ही व्होट बँकेसाठी हे काम करत नाही. आम्ही जे करत आहोत, त्याला देश वर्षानुवर्षे लक्षात ठेवेल, असे रिजिजू म्हणाले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com