नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री (Chief Minister) कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेस (Congress) विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा आज केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंगू सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. सिद्धू निवडणूक लढतील तेथून त्यांना पराभूत करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे.
कॅप्टन अमरिंदरसिंग म्हणाले की, सिद्धू यांना काही माहिती नाही. ते जास्त बोलतात पण त्यांना मेंदू नाही. मी कधीही अमित शहा आणि धिंडसा यांच्याशी बोललो नव्हतो. परंतु, मी लवकरच त्यांच्याशी बोलणार आहे. काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि आम आदमी पक्ष यांच्या विरोधात भक्कम आघाडी करणार आहे. सिद्धू जिथून लढेल तिथे आम्ही विरोधात उतरू. सिद्धू आल्यापासून काँग्रेसची लोकप्रियता 25 टक्के घसरल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
पक्षाच्या स्थापनेची घोषणा करताना कॅप्टन अमरिंदरसिंग म्हणाले की, आमच्यासोबत अनेक काँग्रेस नेते आहेत. पक्षाची स्थापना झाल्यानंतर या नेत्यांची नावे आम्ही जाहीर करू. पंजाबमधील सर्वच्या सर्व 117 जागा आमचा पक्ष लढवेल. आम्ही स्वबळावर लढणार की आघाडी करणार याचे उत्तर तुम्हाला आगामी काळात मिळेल. पक्षाच्या नावाची घोषणा लवकरच होईल. कारण आमचे वकील निवडणूक आयोगासोबत या संदर्भात चर्चा करीत आहेत.
अमित शहांची उद्या भेट घेणार असल्याचे कॅप्टन यांनी या वेळी सांगितले. ते म्हणाले की, उद्या आम्ही 25 ते 30 जणांना घेऊन दिल्लीला जाणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अमित शहांशी चर्चा करणार आहोत. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांवर काय तोडगा निघेल, याबाबत आताच सांगता येणार नाही. याबाबत मी त्यांना माझे मत मागील बैठकीतच सांगितले होते.
भाजपसोबत आघाडी करण्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, आमचा पक्ष जागावाटपाच्या संदर्भात प्रस्ताव आल्यास विचार करेल. परंतु, आम्ही भाजपसोबत जाणार आहोत, असे आम्ही कधीच म्हटले नव्हते. मी फक्त म्हटले होते की मी आणि माझा पक्ष जागावाटपाबाबत चर्चा करीत आहोत. अद्याप आघाडी करण्याविषयी कोणतीही चर्चा राजकीय पक्षांशी झालेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.