American Tourist Woman Rape Case : क्रूरतेचा कळस! अमेरिकन पर्यटक महिलेला तीन दिवस डांबून ठेवलं, गुंगीचं औषध दिलं, बलात्कार केला अन्...

US woman assault Karnataka homestay : कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यात एका अमेरिकन पर्यटक महिलेवर होमस्टेमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
American Tourist Woman Rape Case
American Tourist Woman Rape Casesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कर्नाटकमधील कोडगू येथे अमेरिकन पर्यटक महिलेवर होमस्टेमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे.

  2. या प्रकरणी कर्मचारी आणि मालक दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

  3. गुन्हा लपवण्यासाठी इंटरनेट बंद करून महिलेला तीन दिवस डांबून ठेवल्याचा आरोप आहे.

Karnataka Crime News : कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली असून एका अमेरिकन पर्यटक महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर येथील राजकीय वातावरण चांगलेच तापलं असून भाजपने यावरून काँग्रेसला धारेवर धरले आहे. तर ही घटना कोडगू जिल्ह्यातल्या कुट्टा परिसरातील एका होमस्टेमध्ये उघडकीस आल्यानंतर कर्मचारी व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे कर्मचाऱ्यानं केलेला गुन्हा लपवण्यासाठी पीडित महिलेलाही होमस्टेमध्येच डांबून ठेवलं होतं. तसेच होमस्टेचं इंटरनेटही बंद केलं होतं.

समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकन पर्यटक महिला कर्नाटकमध्ये पर्यटनासाठी आली होती. ती कुट्टा भागातील या होमस्टेमध्ये तीन दिवसांसाठी वास्तव्यास होती. होमस्टेमधील कर्मचाऱ्यानं तिला शीतपेयातून गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला. हा सगळा प्रकार समजल्यानंतर होमस्टेच्या मालकानं तो दडवून ठेवण्यासाठी तिथलं इंटरनेट बंद ठेवलं. शिवाय, पीडित महिलेनं हा प्रकार इतर कुणाला सांगू नये, म्हणून तिला होमस्टेमध्येच डांबून ठेवलं.

पण आपण आपल्याबरोबर झालेली ही घटना कोणालाच सांगणार नाही. आपण आपल्या देशात निघून जातो असे सांगून ती महिला तेथून निघाली. होमस्टेमधून निसटताच त्या महिलेनं थेट अमेरिकी दूतावासाशी संपर्क साधत घडलेला सर्व प्रकार तिने सांगितला. ज्यानंतर अमेरिकी दूतावासाने मैसूर पोलिसांशी संपर्क साधून संबंधित प्रकरणाची माहिती दिली.

American Tourist Woman Rape Case
Crime News : निलेश काळभोरचा ‘आज गेम वाजवायचा’, पुण्यातील हॉटेलमध्ये थरार अन् दहशत; पोलिसांनी सापळा लावला अन् दोघांना उचललं

यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर मैसूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच होमस्टेमधील बलात्कार करणारा कर्मचारी वृजेश कुमार जो मूळचा झारखंडचा आहे. त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तसेच घटना उडकीस येऊ नये म्हणून महिलेला होमस्टेमध्येच डांबून ठेवणाऱ्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तर पीडित अमेरिकी पर्यटक महिलेवर मैसूरमधील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

भाजपकडून तिखट शब्दांत टीका

दरम्यान, आता या प्रकरणावरून कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं असून भाजपकडून तिखट शब्दांत टीका केली जातेय. भाजपचे स्थानिक आमदार सी. टी. रवी यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत, एका विदेशी महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार लाजिरवाणा आणि अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे.

अशा घटना भारताच्या अतिथी देवो भव: या मूल तत्वालाच हरताळ फासणाऱ्या असून हा फक्त एका व्यक्तीविरोधातला गुन्हा नसून संपूर्ण देशाच्याच प्रतिमेला डाग लावणारा असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात दोशींवर कठोर कारवाई करत पीडित महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राज्य सरकारला असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

American Tourist Woman Rape Case
Nashik Crime News : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपींचा पाय खोलात, ॲट्रॉसिटी’चे कलम वाढले...

FAQs :

1. ही घटना कुठे घडली?
कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातील कुट्टा येथील होमस्टेमध्ये ही घटना घडली.

2. या प्रकरणात कोणावर गुन्हा दाखल झाला आहे?
होमस्टेतील कर्मचारी आणि मालक दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

3. पोलिसांनी काय कारवाई केली आहे?
दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

4. इंटरनेट बंद करण्यामागचे कारण काय?
गुन्हा लपवण्यासाठी इंटरनेट बंद केल्याचा आरोप आहे.

5. या घटनेचा परिणाम काय होऊ शकतो?
पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com