Amit Shah News : महायुतीला चौथ्या टप्प्यातच बहुमत; अमित शाह नेमके काय म्हणाले?

Amit Shah On Lalu Prasad Yadav : लालूप्रसाद यादव यांनी मुस्लमानांना आरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. देशातील संसदेत भाजप असेपर्यंत आरक्षणाला कोणीही हात लावू शकत नाही, असे अमित शाह यांनी सुनावले.
Amit Shah
Amit ShahSarkarnama

Lok Sabha Election 2024 : भाजपचे स्टार प्रचारक तथा नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी महायुतीला देशात चौथ्या टप्प्यात 270 जागा मिळाल्याचा विश्वास व्यक्त केला. बिहारमधील एका सभेत बोलताना अमित शाह यांनी हा दावा केला. याचवेळी पीओके लवकरच देशात दिसेल, असे सांगून ही मोदीची गॅरंटी असल्याचेही त्यांनी शब्द दिला.

देशात पाचव्या टप्प्यातील मतदान उद्या सोमवारी (ता. 20) होत आहे. निवडणुकीचे पुढचे दोन टप्पे राहिले आहेत. सहाव्या आणि सातव्या टप्प्यात उत्तर भारतात प्रचाराचा धुरळा उडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi आणि भाजचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी यासाठी प्रचारसभांचा सपाटा लावला आहे. बिहार येथे एका सभेत महायुतीला देशात मिळाणाऱ्या आणि महाविकास आघाडी इंडियाला मिळणाऱ्या जागांबाबत भाष्य केले.

अमित शाह Amit Shah म्हणाले, "देशात चौथ्या टप्प्यापर्यंत मतदान झाले आहे. या चार टप्प्यात महायुतीला 270 जागा मिळतील. महाविकास आघाडीला 40 देखील जागा मिळणार नाही. पीओके आपल्या देशाचा भाग आहे. तो ताब्यात घेणारच आहे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर, लालूप्रसाद यादव आणि फारूक अब्दुल हे पाकिस्तानकडे असलेल्या परमाणू बाॅम्बची भीती घालतात. पण भाजपचे कार्यकर्ते परमाणू बाॅम्बला घाबरत नाहीत". पीओके भारताचा असल्याचे तो ताब्यात घेणारच असे सांगाना अमित शाह यांनी मोदीची गॅरंटी दिली.

Amit Shah
Sharad Pawar News : एकनाथ शिंदेंना 2019 मध्ये CM करण्यास हरकत नव्हती, पण..; त्यावेळी नेमकं काय झालं पवारांनी सांगितलं

देशात काँग्रेसची Congress सत्ता होती. त्यावेळी देशात कोठेही बाॅम्बस्फोट व्हायचा. दहशतवादी हल्ले व्हायचे. आता दहशतवाद्यांची देशात बाॅम्बस्फोट करण्याची हिम्मत नाही. लालूप्रसाद यादव यांच्यावर अमित शाह यांनी जोरदार हल्ला चढवला. राज्यात मुख्यमंत्री होते. केंद्रात मंत्री होता. तरी देखील कर्पूरी ठाकूर यांना सन्मानित केले नाही. परंतु मोदींनी कार्पूरी ठाकूर यांना भारत रत्न देऊन सन्मान केल्याचे, अमित शाह यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लालूप्रसाद यादव Laluprasad Yadav यांनी मुस्लमानांना आरक्षण दिले गेले पाहिजे, यावर काही दिवसांपूर्वी भूमिका मांडली होती. त्यावर अमित शाह म्हणाले, देशातील संसदेत भाजप असेपर्यंत आरक्षणाला कोणीही हात लावू शकत नाही. लालूप्रसाद कोणाचे आरक्षण काढून मुस्लमानांना देणार आहे, स्पष्ट करावे. दलित, आदिवासी की, गरजू लोकांचे आरक्षण काढणार? असा सवाल देखील अमित शाह यांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Amit Shah
Nashik Lok Sabha Election News : राजकीय नेत्यांच्या प्रचारातील शालिनतेमुळे उमेदवारांचे वस्त्रहरण टळले !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com