Karnataka Election News: भाजप नेत्यांचा पराभव टाळण्यासाठी अमित शहा मैदानात : 10 जागांवर विशेष लक्ष

Amit Shah In The Field: नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या शेट्टर यांचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करण्याचा निर्धार भाजपने केल्याचे बोलले जात आहे.
Amit Shah
Amit ShahSarkarnama

बंगळूर : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीत (Assembly election) भारतीय जनता पक्षाला (BJP) अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. भाजपच्या सुमारे १० वरिष्ठ नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस आणि इतर पक्षात प्रवेश केला आहे. महत्वाच्या नेत्यांना पक्षाच्या बंडखोरांकडून आव्हान दिले आहे. बहुमत मिळविण्यासाठी या नेत्यांचे जिंकणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे भाजप सोडून गेलेल्या नेत्यांचा पराभव करण्यासाठी भाजप नेतृत्वाने खास रणनीती आखली आहे. भाजपचे मुख्य निवडणूक रणनीतीकार अमित शहा (Amit Shah) यांनी बैठक घेऊन तसे डावपेच आखले आहेत. (Amit Shah in the field to avoid defeat of BJP leaders)

हुबळी-धारवाड मध्यसारख्या जागांवर विशेष जोर देण्यात आला आहे. तिथे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शेट्टर यांचे उजवे हात असलेले महेश टेंगीनाकाई यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. आता शेट्टर यांच्याशी त्यांचा सामना असणार आहे. अथणीत माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना भाजपचे महेश कुमठळ्ळी हे आव्हान देत आहेत. भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे सदस्य चलवादी नारायणस्वामी म्हणाले की, ‘‘आमच्या दुरावलेल्या सहकाऱ्यांना पराभूत करण्यापेक्षा या जागा जिंकण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.’’

Amit Shah
Devendra Fadnavis News : हायकमांडच्या निर्णयाआधीच फडणवीसांनी जाहीर केले कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे नाव

हुबळीच्या भेटीदरम्यान अमित शहर यांनी धारवाड, बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील इतर जिल्ह्यांतील प्रचारात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आणखी रॅली आणि रोड शो आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

धारवाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे धारवाड जिल्ह्यातील विधानसभा जागांची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनीही या जागा विशेषत: हुबळी-धारवाड मध्य जिंकण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली आहे. शेट्टर हे विश्वासघाताचे प्रकरण आहे. कारण त्यांनी भाजपमध्ये सर्व विशेषाधिकारांचा उपभोग घेतला, असे येडियुराप्पा म्हणाले. त्यांच्या मतदारसंघातील मतदार त्यांना कधीच माफ करणार नाहीत. ते कधीही जिंकणार नाहीत, असे येडियुराप्पा यांनी ठासून सांगितले.

Amit Shah
kul challenge to raut : रमेश थोरात भीमा कारखान्यावर आल्यापासून चौकशी लावा : राहुल कुलांचे राऊतांना आव्हान

प्रल्हाद जोशी यांनी हुबळी-धारवाडचे माजी महापौर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश करकट्टी यांना भाजपमध्ये आणण्यात यश मिळवले आहे. नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या शेट्टर यांचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करण्याचा निर्धार भाजपने केल्याचे बोलले जात आहे. गेल्या दहा दिवसांत केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्यासह नऊ केंद्रीय नेते हुबळी शहरात पोहोचले आहेत आणि माजी मुख्यमंत्र्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत.

चिक्कमगळूरमध्ये, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांचा सामना एच. डी. तिम्मय्या यांच्याशी आहे. जे गेल्या महिन्यात काँग्रेसमध्ये गेले होते. येडियुराप्पा निष्ठावंत यु. बी. बणकर हे हिरेकेरूर येथे कृषिमंत्री बी. सी. पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करत आहेत. माजी आमदार के. एस. किरणकुमार निवडणुकीच्या घोषणेच्या काही दिवस आधी काँग्रेसमध्ये गेले आणि तुमकुर जिल्ह्यातील चिक्कनायकनहळ्ळी येथे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जे. सी. माधुस्वामी यांच्याशी लढत आहेत.

Amit Shah
Ajit Pawar News : अजित पवारांचे शिंदे-फडणवीसांना पत्र; वेल्ह्याचे नामकरण राजगड करण्याची मागणी

येडियुराप्पांच्या नातेवाईकांचा धजदमध्ये प्रवेश

अयनूर मंजुनाथ यांचा शिमोगा शहरात भाजपचे नवे उमेदवार चन्नाबसाप्पा यांच्याशी सामना होत आहे. येडियुराप्पा यांचे नातेवाईक एन. आर. संतोष यांना भाजपचे उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी धजदमध्ये प्रवेश केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com