kul challenge to raut : रमेश थोरात भीमा कारखान्यावर आल्यापासून चौकशी लावा : राहुल कुलांचे राऊतांना आव्हान

भीमा पाटस कारखान्याचा विस्तारीकरणाचा खर्च ३६ कोटीवरून ७८ कोटीवर कसा गेला.
Rahul Kul-Ramesh Thorat-Sanjay Raut
Rahul Kul-Ramesh Thorat-Sanjay RautSarkarnama

केडगाव (जि. पुणे) : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सध्या कोणीही गांभीर्याने घेत नाही. मी हक्कभंग समितीचा अध्यक्ष झाल्यामुळे आरोपांचा पुनरूच्चार होत आहे. त्यात नवीन काही नाही. कारखान्याची चौकशी करण्याला माझा विरोध नाही. मात्र, ही चौकशी रमेश थोरात (Ramesh Thorat) कारखान्यावर आल्यापासून करावी, त्यास माझा पाठिंबा आहे. भीमा पाटस कारखान्याचा विस्तारीकरणाचा खर्च ३६ कोटीवरून ७८ कोटीवर कसा गेला. भीमा सेवा संघावर विनातारण विनाकारण ५९ कोटी रूपये कर्ज कोणी आणि कसे उचलले, याचीही चौकशी झाली पाहिजे, असा आरोप भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी केला आहे. (No one is taking Sanjay Raut seriously these days: Rahul Kul's allegation)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि कुल यांच्या विरोधकांनी रविवारी (ता. २६ एप्रिल) वरवंड येथे जाहीर सभा घेत कारखान्यातील भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली होती. यासभेला उत्तर देण्यासाठी कुल यांनी आज पाटस येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी नंदकुमार पवार, दादासाहेब केसकर, तुकाराम ताकवणे, विकास शेलार उपस्थित होते.

Rahul Kul-Ramesh Thorat-Sanjay Raut
Ajit Pawar News : अजित पवारांचे शिंदे-फडणवीसांना पत्र; वेल्ह्याचे नामकरण राजगड करण्याची मागणी

कुल म्हणाले की, मुळात मी २००२ मध्ये प्रचंड कर्जबाजारी असलेल्या कारखान्याचा अध्यक्ष झालो. कारखान्याच्या २००२ च्या निवडणुकीत सभासदांनी थोरात यांना सणसणीत चपराक दिल्याने तेव्हापासून ते आतापर्यंत थोरात यांनी कारखाना निवडणूक लढविण्याचे धाडस केलेले नाही. संजय राऊत म्हणतात की कुल यांनी बाजूला व्हावे, रमेश थोरात कारखाना चालवतील. पण, त्यासाठी निवडणूक तर लढविली पाहिजे ना. जनतेच्या न्यायालयात जाऊन कौल घ्यावा. दुध का दूध व पाणी का पाणी होऊन जाऊदे एकदा.

Rahul Kul-Ramesh Thorat-Sanjay Raut
Sharad Pawar : शरद पवारांच्या भाकरी फिरविण्यावर मुख्यमंत्री शिंदेंचे दिलखुलास उत्तर; म्हणाले...

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ३६ कोटी रुपयांचा हिशेब साखर आयुक्त व सरकारला दिला आहे. संजय राऊत हे अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप करीत आहे. त्यांनी असंगाशी संग करत असताना माझ्या विरोधकांचा इतिहास पाहिला पाहिजे. महाविकास आघाडी सरकार असताना का नाही चौकशी लावली. चांगल्या चाललेल्या कारखान्यात विरोधकांनी राजकारण आणू नये. कारखाना सहकारीच आहे. तो फक्त भाडेतत्वावर चालवायला दिला आहे. कारखाना चालवायला देताना खुले टेंडर होते. क्षमता असणाऱ्या निराणी ग्रुपने ते भरले त्यांना ते मिळाले, असेही कुल यांनी स्पष्ट केले.

Rahul Kul-Ramesh Thorat-Sanjay Raut
Future CM in Maharashtra: मुख्यमंत्रीपदाची 'खुर्ची एक, उमेदवार अनेक'; चर्चा सर्वांचीच पण जनतेच्या मनात कोण?

कुल म्हणाले की, माझे अभियांत्रिकी महाविद्यालय बंद पडल्याचा आरोप होतो आहे. माझ्या विरोधकांना साधे हॅाटेल चालवता आले नाही, ते त्यांनी भाड्याने दिले आहे. अज्ञानातून झालेल्या टीकेला, आरोपांना उत्तर काय द्यायचे, असा प्रश्न मला पडतो. भीमा पाटस कारखाना पुन्हा चालू होताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मदत केली आहे. त्यांचे आभार मी मानतो. राऊत यांच्या सभेने मनोरंजन झाले आहे. संजय राऊत व सहकार क्षेत्राचा काडीचा संबंध नाही. लोकशाही असल्याने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. भीमा पाटस कारखान्यावर माझे वडील सुभाषअण्णा कुल अध्यक्ष असले तरी सह्यांचा अधिकार थोरात यांना होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com