Arvind Kejriwal News : केजरीवालांना लोकसभेचा निकाल जेलमध्येच समजणार; सुप्रीम कोर्टाने दिला दणका

Supreme Court : सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवालांना एक जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांना दोन जूनला जेलमध्ये पुन्हा जावे लागणार आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

New Delhi Political News : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. केजरीवालांना (Arvind Kejriwal News) कोर्टाने एक जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. या जामीनाची मुदत सात दिवस वाढवण्याची विनती करणारा अर्ज केजरीवालांनी केला होता. पण कोर्टाच्या (Supreme Court) रजिस्ट्रीने हा अर्ज दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे केजरीवालांना दोन जूनला पुन्हा जेलमध्ये जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील महिन्यात सुप्रीम कोर्टाने केजरीवालांना लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2020) प्रचारासाठी अंतरिम जामीन दिला आहे. हा जामीन देताना कोर्टाने काही अटीही घातल्या आहेत. निवडणुकीचा प्रचार 30 मेला थांबणार आहे. त्यानंतर एक जूनला अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर चार जूनला निकाल आहे. (Latest Political News)

Arvind Kejriwal
Swati Maliwal Assault Case : विभव कुमारांना तीस हजारी कोर्टाकडून आणखी एक दणका ; आता दिला 'हा' निर्णय!

कोर्टाने एक जूनपर्यंत केजरीवालांना अंतरिम जामीन दिला आहे. ही मुदत सात दिवस वाढवण्याची विनंती केजरीवालांनी कोर्टाकडे केली होती. ही याचिका दाखल करून घेण्यास कोर्टाच्या रजिस्ट्रारकडून नकार देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने केजरीवालांना जामीनासाठी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मुदतवाढीची याचिका दाखल करून घेता येणार नाही, असे रजिस्ट्रार कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मुदतवाढ मिळण्यासाठी केजरीवालांनी आरोग्य तपासणीचे कारण दिले होते. तिहार जेलमध्ये सात किलो वजन कमी झाले असल्याचा दावा केजरीवालांनी यापूर्वी केला आहे. जामीन मिळाल्यानंतर आरोग्य तपासणी केली जात असून किटोन लेव्हल वाढल्याचे समोर आले आहे, असे केजरीवालांनी याचिकेत म्हटले होते.

आरोग्य तपासणीसाठी पाच ते सात दिवसांची गरज आहे. जामीन मिळाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असल्यामुळे आरोग्य तपासणी झालेली नाही. तपासणी झाल्यानंतर 9 जूनला जेलमध्ये हजर राहू, असे केजरीवाल यांनी आपल्या अर्जात म्हटलं होतं. पण हा अर्ज दाखलच करून न घेतल्याने त्यांना धक्का बसला आहे. आता त्यांना कोर्टाच्या आदेशानुसार दोन जूनला सरेंडर व्हावे लागेल. त्यामुळे निवडणुकीचा निकालही जेलमध्ये समजणार आहे.

Arvind Kejriwal
Swati Maliwal Assault Case : विभव कुमारांना तीस हजारी कोर्टाकडून आणखी एक दणका ; आता दिला 'हा' निर्णय!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com