

Parliament debate : संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले आहेत. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे आदेश कुणी दिले, याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत द्यावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांतील कामकाज जणू ठप्प झाले आहे. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावरून आता भाजपनेही आक्रमक पवित्रा घेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना टार्गेट केले आहे.
संसदेतील कोंडी फोडण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असतानाच बुधवारी अमित शाह या मुद्द्यावर पहिल्यांदाच मीडियासमोर आले. त्यांनी आपण चर्चेला तयार असल्याचे सांगत विरोधकांना आव्हान दिले. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, मी विरोधकांना सांगू इच्छितो की, तुम्ही लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दुपारी दोन वाजेपर्यंत द्या. तीन वाजता चर्चा सुरू करू आणि मी उद्या तीन वाजता या चर्चेला उत्तर देतो.
संसदेत चर्चा करण्याचे नियम बनले आहेत. मला कुणीतरी म्हणते की तुम्ही बोला. इतक्या गंभीर मुद्द्यावर अशाप्रकारे चर्चा होत नाही. तुमच्या पध्दतीत असे होत असेल, पण संसदीय पध्दत अशी नाही. संसदेत नियोजनानुसार चर्चा होते. आज दुपारी तीन वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत जोपर्यंत त्यांना वाटेल तोपर्यंत आणि उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत मी चर्चेसाठी तयारी आहे, असे शाह म्हणाले.
अध्यक्षांनी परवानगी दिली तर आम्ही प्रश्नोत्तराचा तासही रद्द करायला तयार आहोत. उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत मी स्वत: उपस्थित राहीन. प्रत्येक गोष्टी लिहून काढेन आणि प्रत्येक गोष्टीचे उत्तर देईन. त्यामाध्यमातून देशासमोर सर्व गोष्टी येतील आणि 'दूध का दूध पाणी का पाणी' होईल. आता चर्चा करायचीय की गोंधळ घालायचा, हे विरोधकांनी ठरवावे, असे आव्हान शहांनी दिले.
शहांच्या या विधानानंतर काही मिनिटांतच राहुल गांधी यांनी हे आव्हान धुडकावून लावले. ते म्हणाले, अमित शाह यांचे भाषण ऐकण्यात आम्हाला रस नाही. विद्यार्थ्यांवर पेलेट गन चालविण्याचे आदेश कुणी दिली, विद्यार्थ्यांना लाठ्यांनी मारण्याचे आदेश कुणी दिले? दिल्ली पोलीस हे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत आहेत. मग अमित शहांनी आदेश दिले की नाही? त्यांनी आदेश दिला असेल राजीनामा द्यावा, कारण ते दोषी आहेत. त्यांनी आदेश दिले नसतील तरीही राजीनामा द्यावा, कारण ते सक्षम नाहीत.
मागील २० दिवस ते गायब होते. गाडी येत होती जात होती. ३० गाड्या त्यांच्या अवतीभवती होत्या. अमित शाह यांच्या फुग्यातून गॅस निघून गेला आहे. त्यात पुन्हा गॅस भरण्याचा प्रयत्न करत आहेत, पण फुगा फुटला आहे. संसदेत येण्याची त्यांची हिंमत नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. विरोधकांच्या या भूमिकेमुळे संसदेतील कोंडी फुटण्याची शक्यता धुसर झाली आहे. अधिवेशनाचा गुरुवारी अखेरचा दिवस आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.