Amit Shah : अमित शहांनी महाराष्ट्रातील 'ती' दोन प्रकरणं लोकसभेत सांगितली! वक्फवरून विरोधकांवर तुटून पडले...

Waqf Bill Debate in Parliament 2025 : अमित शहांनी देशभरात वक्फ बोर्डाने ताब्यात घेतलेल्या काही जमिनींची यादी वाचून दाखवली.
Amit Shah : अमित शहांनी महाराष्ट्रातील 'ती' दोन प्रकरणं लोकसभेत सांगितली! वक्फवरून विरोधकांवर तुटून पडले...
Published on
Updated on

New Delhi News : वक्फ विधेयकावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेत विरोधकांवर जोरदार शरसंधान साधले. यावेळी त्यांनी वक्फ बोर्डाने देशभरात दावा केलेली अनेक प्रकरणे सभागृहात सांगितले. त्यांनी महाराष्ट्रातील दोन प्रकरणांचाही उल्लेख केला. काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी केवळ व्होट बँकेसाठी हे विधेयक नको आहे, अशी टीका शहांनी यावेळी केली.

अमित शहांनी देशभरात वक्फ बोर्डाने ताब्यात घेतलेल्या काही जमिनींची यादी वाचून दाखवली. ते म्हणाले, 2001 ते 2012 दरम्यान 2 लाख कोटींची वक्फची संपत्ती खासगी संस्थांना 100 वर्षांसाठी लीझवर हस्तांतरित करण्यात आली. बेंगलुरूमध्ये हायकोर्टाने 602 एक जमीन जप्त करण्यापासून रोखली. विजयपुरामध्ये 1500 एकर जमिनीवर दावा करत करण्यात आला. 500 कोटींची जमीन महिना 12 हजार रुपयांचे भाडे आकारत फाईव्ह स्टार हॉटेलला दिली.

Amit Shah : अमित शहांनी महाराष्ट्रातील 'ती' दोन प्रकरणं लोकसभेत सांगितली! वक्फवरून विरोधकांवर तुटून पडले...
Nilesh Lanke News : शिवरायांचे विचार सांगत लंकेंचं वक्फवर भाषण, सुप्रिया सुळेंनी पाठ थोपटली, अध्यक्षांकडूनही कौतुक

कर्नाटकात एका मंदिरावर दावा सांगण्यात आला. ख्रिश्चन समाजाच्या अनेक जमिनींवर कब्जा करण्यात आला आहे. तेलंगणात 66 हजार कोटींच्या 1700 एकर जमिनीवर वक्फने दावा केला आहे. आसाममध्ये 134 एकर जमिनीवर दावा केला आहे. हरियाणातील गुरुद्वाराची जमीन वक्फला देण्यात आली. प्रयागराजमध्ये चंद्रशेखर आझाद पार्कलाही वक्फ म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती शहांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रामध्येही दोन मंदिरांच्या जागांवर वक्फने दावा केल्याचे शहांनी सांगितले. महाराष्ट्रात वडणगे गावात महादेव मंदिरावर दावा करण्यात आला. तर बीडमध्ये कंकालेश्वर मंदिराची 12 एकर जमीन वक्फ बोर्डाने जबरदस्तीने घेतल्याची माहिती शहांनी यावेळी दिली. वडगणे हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गाव आहे. मागील वर्षी या गावात आंदोलनही झाले होते.

Amit Shah : अमित शहांनी महाराष्ट्रातील 'ती' दोन प्रकरणं लोकसभेत सांगितली! वक्फवरून विरोधकांवर तुटून पडले...
Shiv Sena News : सावंतांच्या भाषणानंतर काही मिनिटांत श्रीकांत शिंदे बोलू लागले अन् पळाले...पळाले आवाज आला!

विरोधकांवर टीका करताना शहा म्हणाले, चार वर्षांत मुस्लिम बांधवांना कळेल की, हा कायदा त्यांच्याच बाजूचा आहे. विरोधक म्हणतात, याची देखरेख करू नका. हा पैसा देशातील गरीब मुस्लिमांचा आहे. हा चोरीसाठी नाही. याचे जे ठेकेदार इथे जोरजोरात बोलत आहेत. त्यांना वाटत आहे, यामुळे आपण जिंकू. पण विरोधक या देशाला तोडू इच्छितात.

मी मुस्लिमांना सांगू इच्छितो की, तुमच्या वक्फमध्ये एकही गैरमुस्लिम येणार नाही. या विधेयकात अशी कुठलीच तरतुद नाही. पण वक्फ बोर्ड आणि वक्फ परिषद आता वक्फची संपत्ती विकणाऱ्यांना बाहेर काढेल. वक्फच्या नावाने आपली संपत्ती 100 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देणाऱ्यांना पकडू, असेही शाह म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com