Amol Kolhe praised Nilesh Lanke : ‘जिंकलास भावा’ म्हणत कोल्हेंनी थोपटली लंकेंची पाठ अन्‌ विखेंना लगावला टोला!

Lok Sabha Membership Oath : नगर दक्षिणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांनी आज (ता. 25 जून) इंग्रजीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेत सुजय विखे पाटील यांना प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे.
Nilesh Lanke-Amol Kolhe-Sujay Vikhe Patil
Nilesh Lanke-Amol Kolhe-Sujay Vikhe Patil Sarkarnama

New Delhi, 25 June : नगर दक्षिणचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांनी आज (ता. 25 जून) इंग्रजीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेत माजी खासदार सुजय विखे पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे. लंकेंनी खासदारकीची शपथ इंग्रजीतून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘जिंकलास भावा’ म्हणत त्यांचे कौतुक केले तर विखे पाटील यांना नाव न घेता टोला लगावला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांना उद्देशून ‘संसदेत इंग्रजीत बोलावं लागतं,’ असे म्हणत नीलेश लंकेंना डिवचले होते. त्या वाक्याची त्या वेळी राज्यभर जोरदार चर्चा झाली होती. नगर दक्षिणमधून खासदार झालेले लंके यांनी आज चक्क इंग्रजीतून लोकसभा सदस्यत्वाची (LokSabha Membar) शपथ घेतली.

नगर दक्षिणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नीलेश लंके यांनी आज इंग्रजीमधून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेऊन डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रतिउत्तर दिल्याचे मानले जात आहे. विखे पाटील यांनी दिलेल्या आव्हानाला लोकसभेत पहिल्यांदा इंग्रजीत बोलून उत्तर देण्याचे लंके यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ठरवलं होते. त्यानुसार त्यांनी आज खासदारकीची शपथ इंग्रजीतून घेतली

Nilesh Lanke-Amol Kolhe-Sujay Vikhe Patil
Dhairyasheel Mohite Patil : मोहिते पाटील घराण्यातील चौथ्या खासदाराने मराठीतून घेतली शपथ

लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर त्यांचे लोकसभेतील सहकारी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘जिंकलास भावा’ म्हणत त्यांचे कौतुक केले आहे, तर सर्वसामान्य माणसाच्या ताकदीला कमी लेखू नका, असे म्हणत कोल्हे यांनी विखेंना टोला लगावल्याचे मानले जात आहे. ‘आणि हो तुम्ही इंग्रजी बोलू शकता, तुम्ही इंग्रजी चालू शकता, इंग्रजी एक मजेशीर भाषा आहे, असेही कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Nilesh Lanke-Amol Kolhe-Sujay Vikhe Patil
Sharad Pawar On Nilesh Lanke Oath : नीलेश लंकेंची इंग्रजीतून शपथ अन् शरद पवारांना आनंद झाला; नेमके काय म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com